AUS W Beat PAK W, 2024 ICC Women's T20 World Cup 14th Match Scorecard: ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 9 गडी राखून केला पराभव, उपांत्य फेरीत आपले स्थान केले निश्चित

यासह ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. तर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.

AUS W (Photo Credit - X)

Australia Women's National Cricket Team vs Pakistan Women's National Cricket Team 14th Match Scorecard: 2024 आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा 14 वा सामना आज 11 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (AUS W vs PAK W) यांच्यात दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. तर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.

पाकिस्तानचा संघ 19.5 षटकांत केवळ 82 धावांवर गारद

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि दोन फलंदाज अवघ्या 18 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 19.5 षटकांत केवळ 82 धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून आलिया रियाझने सर्वाधिक 26 धावांची खेळी खेळली. आलिया रियाझशिवाय सिद्रा अमीन आणि इरम जावेदने प्रत्येकी 12 धावा केल्या.

ऍशले गार्डनरने घेतल्या सर्वाधिक चार विकेट

ऑस्ट्रेलियाकडून ऍशले गार्डनरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ऍशले गार्डनरशिवाय जॉर्जिया वेअरहॅम आणि ॲनाबेल सदरलँडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकात 83 धावा करायच्या होत्या. (हे देखील वाचा: Pakistani Captian Fatima Sana Father Death: टी-20 वर्ल्ड कप दरम्यान दु:खद बातमी, पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनाच्या वडिलांचे निधन)

ऑस्ट्रेलियन संघाची चांगली सुरुवात

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीर बेथ मुनी आणि ॲलिसा हिली यांनी अवघ्या 25 चेंडूत 36 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाने अवघ्या 11 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून ॲलिसा हिलीने सर्वाधिक नाबाद 37 धावांची खेळी खेळली. एलिसा हिलीशिवाय एलिस पेरीने नाबाद 22 धावा केल्या. पाकिस्तानकडून सादिया इक्बालने सर्वाधिक एक विकेट घेतली.

Tags

2024 ICC Women's T20 World Cup Preview 2024 ICC Women’s T20 World Cup 2024 ICC महिला T20 विश्व कप 2024 आईसीसी महिला टी20 विश्व कप AUS W vs PAK W AUS W vs PAK W 2024 ICC Women's T20 World Cup Preview AUS W vs PAK W Preview Australia vs Pakistan Australia Women vs Pakistan Australia Women vs Pakistan Women Details Australia Women vs Pakistan Women Head to Head Records Australia women's national cricket team Australia Women's National Cricket Team vs Pakistan Women's Cricket Team Australia Women's National Cricket Team vs Pakistan Women's National Cricket Team Dream11 Team Prediction Australia Women's National Cricket Team vs Pakistan Women's National Cricket Team Preview Beth Mooney Ellyse Perry ICC Women’s T20 World Cup 2024 ICC महिला T20 विश्व कप 2024 Pakistan women's cricket team Women's T20 World Cup आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 एलिस पेरी ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया वि.पाकिस्तान ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ पाकिस्तान महिला क्रिकेट संघ बेथ मुनी महिला टी-20 विश्वचषक


संबंधित बातम्या