हसन अलीनंतर आता ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मैक्सवेल भारताचा जावई होण्याच्या तयारीत, पहा Photos

आता हसननंतर अजून एक विदेश क्रिकेटपटू भारतीय तरूणीशी विवाह बंधनात अडकणार आहे. आणि तो आहे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मैक्सवेल. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूला भारतीय सेलिब्रिटी विनी रमनसोबत वारंवार एकत्र पहिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार हे दोघेही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

ग्लेन मैक्सवेल आणि विनी रमन (Photo Credit: vini.raman/Instagram)

पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज हसनी अली (Hassan) याने दुबईमध्ये हरियाणाची रहिवाशी शामिया आरजू हिच्यासह नुकताच विवाहबंधनात अडकला. हसन आणि शामियाचा निकाह दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये पार पडला. याआधी अन्य पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा देखील विवाह भारतीय मूळच्या मुलीशी झालेला आणि यात सर्वात प्रसिद्ध म्हणजे शोएब मलिक आणि टेनिसपटू सानिया मिर्झा. पण, आता हसननंतर अजून एक विदेश क्रिकेटपटू भारतीय तरूणीशी विवाह बंधनात अडकणार आहे. आणि तो आहे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मैक्सवेल (Glenn Maxwell). (पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली आणि हरियाणाची शामिया आरजू अडकले विवाह बंधनात, पहा लग्नाचे Photos)

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूला भारतीय सेलिब्रिटी विनी रमन (Vini Raman) हिच्यासोबत वारंवार एकत्र पहिले आहेत. शिवाय त्यांचे एकमेकांसहितचे सोशल मीडियावरील फोटो त्यांच्या प्रेमाची कबुली देतात. सूत्रांच्या माहितीनुसार हे दोघेही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, हे दोघे लग्न कधी करणार याबद्दल अद्याप काही समोर आले नाही. विनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. मैक्सवेल आणि विनीचे फोटो बर्‍याचदा सोशल मीडियावर दिसतात. मैक्सवेल आणि विनी एकमेकांचे फोटो स्वतःच शेअर करतात.

वेळ घालवल्याबद्दल कृतज्ञ

आयरिश बार्टेंडर्स हे मैत्रीपूर्ण माणसे आहेत

दरम्यान, यापूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज शॉन टेट (Shaun Tait) याने भारतीय वंशाच्या महिलेशी लग्न केले आहे. त्यामुळे, मैक्सवेल आणि विनी- हे दोघे लग्न कधी करणार, याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement