AUS W vs SA W, 2024 1st Semi Final Stats And Record Preview: ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज होणार हाय व्होल्टेज सामना; 'हे' मोठे विक्रम मोडण्याची शक्यता

आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 च्या बाद फेरीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित करण्यात आले आहेत. या स्पर्धेच्या साखळी टप्प्यात अनेक मोठे अपसेट पाहायला मिळाले. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे.

AUS W vs SA W, 2024 1st Semi Final Stats And Record Preview: ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज होणार हाय व्होल्टेज सामना; 'हे' मोठे विक्रम मोडण्याची शक्यता
Photo Credit-X

Australia Women National Cricket Team vs South Africa Women National Cricket Team 1st Semi Final Match: 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा (2024 ICC Women’s T20 World Cup) पहिला उपांत्य सामना आज ऑस्ट्रेलिया संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) क्रिकेट संघ यांच्यात 17 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाची कमान ताहलिया मॅकग्राच्या हाती आहे. तर, दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व लॉरा वोल्वार्ड करत आहे. (AUS W vs SA W 1st Semi Final Dream11 Team Prediction: उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरशीची लढत; येथे सर्वोत्तम ड्रीम11 संघ पहा)

आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 च्या बाद फेरीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित करण्यात आले आहेत. या स्पर्धेच्या साखळी टप्प्यात अनेक मोठे अपसेट पाहायला मिळाले. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अ गटात होता तर दक्षिण आफ्रिकेने ब गटातून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरी सामना जिंकणारा संघ रविवार, 20 ऑक्टोबर रोजी अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्यात विजयी ठरलेला संघ विश्वचषकावर त्यांचे नाव कोरेल.

हेड टू हेड रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हेड टू हेड रेकॉर्डवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आहे. उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या 10 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने नऊ वेळा विजय मिळवला आहे. तर. दक्षिण आफ्रिकेने फक्त एकदाच विजय मिळवला आहे.

हे मोठे विक्रम आजच्या स्पर्धेत होऊ शकतात

  • ऑस्ट्रेलियाची सलामीवीर फलंदाज बेथ मुनीला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण करण्यासाठी 42 धावांची गरज आहे.
  • ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण करण्यासाठी 57 धावांची गरज आहे.
  • ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू ताहलिया मॅकग्राला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 43 धावांची गरज आहे.
  • ऑस्ट्रेलियाची गोलंदाज मेगन शटला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळी पूर्ण करण्यासाठी 5 विकेट्सची गरज आहे.
  • ऑस्ट्रेलियाची गोलंदाज मेगन शुटला आयसीसी महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेत 50 बळी पूर्ण करण्यासाठी 2 बळींची गरज आहे.
  • ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज किम गर्थला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 बळी पूर्ण करण्यासाठी 2 बळींची गरज आहे.
  • ऑस्ट्रेलियाची गोलंदाज किम गर्थला आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत 50 बळी पूर्ण करण्यासाठी 3 बळींची गरज आहे.
  • दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 87 धावांची गरज आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेची दिग्गज अष्टपैलू खेळाडू मेरीने कॅपला 5000 धावा पूर्ण करण्यासाठी 13 धावांची गरज आहे.

दोन्ही संघातील खेळाडू

ऑस्ट्रेलिया: बेथ मूनी (विकेटकीपर), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन.

दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, मारिजने कॅप, सुने लुस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.

(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2024 05:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).