AUS-W vs IND-W D/N Test 2021: पिंक-बॉल टेस्टमध्ये ‘ही’ आक्रमक फलंदाज दाखवणार आपला जलवा, माजी दिग्गज अष्टपैलू म्हणाली -‘तिची भूमिका खूप महत्वाची’

भारत-ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये पिंक बॉल टेस्ट मॅच 30 सप्टेंबरपासून खेळला जाईल.

शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा (Photo Credit: PTI)

AUS-W vs IND-W D/N Test 2021: विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय पुरुष क्रिकेट संघाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Tour) दिवस/रात्र कसोटी (D/N Test) सामना खेळला होता. अ‍ॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारतासाठी चांगला ठरला नाही. दुसऱ्या डावात भारतीय संघ 36 धावांवर ऑलआऊट झाला जो त्यांच्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे. आता मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वात भारतीय महिला संघ (India Women's Cricket Team) ऑस्ट्रेलियामध्ये गुलाबी चेंडूने (Pink-Ball) दम दाखवण्याच्या तयारीत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये पिंक बॉल टेस्ट मॅच 30 सप्टेंबरपासून खेळला जाईल. भारतीय महिला संघ पहिल्यांदा डे/नाईट कसोटी सामना खेळणार आहे आणि यामध्ये वरिष्ठ खेळाडूंची भूमिका सर्वात महत्वाची असेल, पण युवा सलामीवीर शेफाली वर्मावर (Shafali Verma) देखील पुन्हा एकदा सर्वांची नजर असेल आणि माजी भारतीय क्रिकेटपटू हेमलता कला (Hemlata Kala) यांना विश्वास आहे आहे की ती या परीक्षेत यशस्वी होईल. (AUS-W vs IND-W 2021: ऑस्ट्रेलियन Alyssa Healy ‘या’ भारतीय स्टार फलंदाजाची फॅन, गुणगान गात पाहा काय म्हणाली वाचा)

काला यांचे असे मत आहे की, आक्रमक सलामीवीर शेफाली वर्माची भूमिका ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्ध आगामी गुलाबी चेंडू कसोटीत महत्त्वाची ठरेल कारण ती "अद्वितीय क्रिकेट" खेळते आणि युवा फलंदाजासाठी कोणतेही आव्हान असणार नाही. 17 वर्षीय शेफालीने यंदा वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणात एकूण 159 धावा केल्या आणि ती 'सामनावीर' ठरली. आणि आता ती ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचा भाग आहे. “शेफालीची महत्वाची भूमिका आहे (खेळण्यासाठी) आणि मला वाटते की ती लाल-बॉल (क्रिकेट) मध्ये असल्याने यशस्वी होईल, कारण तिचा खेळ तसा आहे. तिचा पॉवर-हिटिंग खेळ आहे, म्हणून मला वाटते की ती यशस्वी होईल,” सात कसोटी खेळलेल्या कला यांनी निवडक पत्रकारांशी व्हर्च्युअल कॉन-कॉलमध्ये सांगितले. तथापि काला पुढे म्हणाल्या की शेफालीसह अन्य फलंदाजांना देखील पुढाकार घेण्याची गरज आहे.

“पण त्यासोबतच, मी हे सांगू इच्छिते की आमच्यासाठी शफाली सोबत, सर्व फलंदाजांनी या कसोटी सामन्यात क्लिक करणे महत्वाचे आहे, कारण प्रत्येकाचे तंत्र वेगळे आहे. मला वाटते की शफालीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे आणि गुलाबी बॉल टेस्टमध्ये ती खूप महत्वाची भूमिका बजावेल,” 46 वर्षीय माजी अष्टपैलूने पुढे म्हटले. भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा 21 सप्टेंबर रोजी सकाळी 5.35 पासून SONY Six चॅनेलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल.