AUS vs SL T20I 2019: डेविड वॉर्नर याचे तिसरे शानदार अर्धशतक, विराट कोहली याच्या रेकॉर्डची केली बरोबरी करत 'या' विक्रमांची केली नोंद

कोणत्याही द्विपक्षीय टी-20आंतरराष्ट्रीय मालिकेत 3 किंवा त्याहून अधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी हा पराक्रम भारतीय कर्णधार विराट कोहली आणि कॉलिन मुनरो यांनी केला होता.

डेविड वॉर्नर (Photo Credit: Getty)

ऑस्ट्रेलियाचा (Australia) सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने पुन्हा एकदा सिद्ध केले की टी-20 क्रिकेटमध्ये त्याला जगातील धोकादायक फलंदाजांपैकी एक का मानले जातो. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत तो प्रत्येक सामन्यात नाबाद धावा केल्या. तिसर्‍या आणि अंतिम मॅचमध्ये त्याने नाबाद 57 धावा केल्या आणि संघाला 7 गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. तिसऱ्या सामन्यात नाबाद अर्धशतकाच्या जोरावर वॉर्नरने टी-20 क्रिकेटमधील अनेक विक्रमांची नोंद केली. बैननंतर पहिल्यांदा वॉर्नरने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि आपली पहिली मालिका अत्यंत संस्मरणीय बनविली. (AUS vs SL 2nd T20I: लक्षन संदकन याने स्टिव्ह स्मिथ याला धावबाद करण्याची सुवर्ण संधी गमावल्याने सोशल मीडियावर झाला ट्रोल, Video)

श्रीलंकाविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात वॉर्नरने 37 धावा करत टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 9000 हजार धावा पूर्ण केल्या. याबरोबर त्याने या सामन्यात 49 धावा केल्याबरोबर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 2000 धावा करणारावॉर्नर पहिला फलंदाज ठरला आहे. वॉर्नरने आतापर्यंत 73 सामन्यात 2000 धावा केल्या आहेत तर कर्णधार एरॉन फिंच 55 सामन्यात 1772 धावांसह दुसर्‍या स्थानावर आहे. दुसरीकडे, या मालिकेत वॉर्नरने या मालिकेत तिसऱ्यानंद 50 पेक्षा धावा केल्या आहेत. तेही बाद न होता. पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 100 धावा केल्या तर दुसर्‍या सामन्यात नाबाद 60 धावा फटकावताना संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. वॉर्नरने तिसऱ्या सामन्यात नाबाद 57 धावा केल्या. यासह कोणत्याही द्विपक्षीय टी-20आंतरराष्ट्रीय मालिकेत 3 किंवा त्याहून अधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी हा पराक्रम भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि कॉलिन मुनरो (Colin Munro) यांनी केला होता. 2015-16मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर कोहलीने नाबाद 90, 59 आणि 50 धावा केल्या होत्या.

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात वॉर्नरने आंतरराष्ट्रीय टी-20 कारकीर्दीमधील 16 वे अर्धशतक झळकावले आणि मार्टिन गप्टिल याच्यासह पॉल स्टर्लिंग याची बरोबरी केली. गप्टिल आणि स्टर्लिंगने टी-20 मध्ये 16 अर्धशतक केले आहेत. टी-20 मध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा विराट कोहली हा पहिला फलंदाज आहे, तर रोहितने 21 वेळा क्रिकेटच्या या प्रकारात अर्धशतके झळकावली आहेत आणि तो दुसर्‍या स्थानावर आहे. वॉर्नरने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेविरूद्ध शानदार फलंदाजी केली. बैननंतरची ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका होती, ज्यामध्ये तो पूर्णपणे यशस्वी राहिला.