AUS vs SL 1st T20I: स्टीव्ह स्मिथ याने एरोन फिंच याला पॅट कमिन्स याच्या Hat-Trick ची करून दिली आठवण, पाहा 'हा' मजेदार (Video)

नवीन ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर कमिन्स हॅटट्रिकवर होता हे स्मिथला बहुधा ठाऊक नव्हते. त्यामुळे, कॉमेंटेटर्सने स्मिथला याची आठवण करून दिली आणि त्याने फिंचला माहिती दिली.

स्टीव्ह स्मिथ, एरोन फिंच (Photo Credit: Getty)

श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध मेलबर्नमध्ये झालेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) शुक्रवारी जवळजवळ अडचणीत सापडला होता. मायक्रोफोनद्वारे ऑन एअर कमेन्टर्सशी संवाद साधणार्‍या स्मिथने 17 व्या षटकात पॅट कमिन्स (Pat Cummins) गोलंदाजी करत असताना कॉमेंटेटर्सचे इनपुट कर्णधार एरोन फिंच (Aaron Finch) पर्यंत पोहचवले. श्रीलंकाविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमधील तिसऱ्या आणि अंतिम मॅचमध्ये विजय मिळवत क्लीन-स्वीप पूर्ण केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये सहा गडी गमावून 142 धावा केल्या. यजमान संघाने हे लक्ष्य 17.4 ओव्हरमध्ये तीन गडी गमावून पूर्ण करत विजय मिळवला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला नाबाद 57 धावांच्या खेळीसाठी सामनावीर ठरविण्यात आले. (AUS vs SL T20I 2019: डेविड वॉर्नर याचे तिसरे शानदार अर्धशतक, विराट कोहली याच्या रेकॉर्डची केली बरोबरी करत 'या' विक्रमांची केली नोंद)

दरम्यान, या मॅचमध्ये कमिन्सला हॅटट्रिक घेण्याची संधी होती, मात्र ती हुकली. 17 व्या ओव्हरच्या सुरुवातीला कमिन्स जेव्हा गोलंदाजीला आला तेव्हा ओव्हरमधील शेवटच्या दोन चेंडूंत दोन विकेट्स घेतल्यामुळे नवीन ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर कमिन्स हॅटट्रिकवर होता हे स्मिथला बहुधा ठाऊक नव्हते. त्यामुळे, कॉमेंटेटर्सने याची स्मिथला आठवण करून दिली आणि त्याने फिंचला माहिती दिली आणि स्लिपमध्ये फिल्डर ठेवण्याची कल्पना दिली. पण, फिंचने ती मान्य केली नाही आणि फिल्डिंगमध्ये कोणताही बदल केला नाही. कमिन्सचा हा चेंडू फलंदाजाने सोडले आणि कमिन्सची हॅटट्रिक पूर्ण होऊ शकली नाही. पहा याचा 'हा' मजेदार व्हिडिओ:

मायक्रोफोनद्वारे कॉमेंटेटर्सशी बोलणे हे ऑस्ट्रेलियामधील टी-20 सामन्यांमध्ये सामान्य आहेत. ही घटना भारतातील आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये क्वचितच आढळली असली तरी इंडियन प्रीमियर लीगमध्ये ही एक सामान्य पद्धत आहे. त्यांच्या संवादादरम्यान जास्त माहितीवर अवलंबून करून देण्यासाठी कॉमेंटेटर्स अनेकदा अडचणीत सापडल्याची उदाहरणे आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा टी-20 मध्ये माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) यानेच हॅटट्रिक घेतली आहेत.



संबंधित बातम्या

IND vs AUS, 4th Test Pitch Report And Weather Update: चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज की ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज वर्चस्व गाजवतील? सामन्यापूर्वी, मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती घ्या जाणून

South Africa vs Pakistan, 1st Test Match Live Streaming In India: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पहिली कसोटी, जाणून घ्या भारतात कधी, कुठे आणि कसे लाइव्ह मॅचचा आनंद घेता येणार

Australia vs India, Boxing Day Test: टीम इंडिया मेलबर्नमध्ये विजयाची हॅट्ट्रिक करू शकेल का? बॉक्सिंग डे कसोटीत सर्वांच्या नजरा असणार या दिग्गज खेळाडूंवर

Virat Kohli Test Record Against Australia: कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची अशी आहे कामगिरी, 'रन मशीन'; च्या आकडेवारीवर एक नजर