AUS vs SL 2nd T20I: लक्षन संदकन याने स्टिव्ह स्मिथ याला धावबाद करण्याची सुवर्ण संधी गमावल्याने सोशल मीडियावर झाला ट्रोल, Video
संदकनला स्मिथला धावबाद करण्याची संधी होती, पण त्याने हातात चेंडू घेऊन स्टंप्स उखडण्याऐवजी त्याने एका हाताने तो उखडून टाकला आणि स्मिथ थोडक्यात बचावला.
बुधवारी द गाब्बा येथे ऑस्ट्रेलिया (Australia) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील दुसर्या टी-20 सामना रंगला. पहिला सामना गमावल्यानंतर श्रीलंकेला दुसरी मॅच जिंकणे गरजेचे होते. पण, पहिले फलंदाजी करत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला मालिका विजयासाठी 118 धावांचे सोप्पे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाने 1 धावावर पहिली विकेट गमावली. यानंतर श्रीलंकेला अजून एक विकेट घेऊन यजमान संघावर दडपण आणण्याची सुवर्ण संधी होती, पण ती त्यांनी गमावली आणि सोबत सामन्यासह मालिकाही गमावली. श्रीलंकाने दिलेल्या 118 धावांच्या पाठलाग करताना यजमानांनी डावाच्या पहिल्या ओव्हरमध्ये कर्णधार आरोन फिंच याची महत्त्वपूर्ण विकेट गमावली. त्यानंतर, डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांच्या 117 धावांच्या चांगल्या जोडीमुळे ऑस्ट्रेलियाने सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिका खिशात घातली. वॉर्नरने 41 चेंडूंत नाबाद 60 धावा केल्यामुळे त्याने सलग दुसरा सामनावीर पुरस्कार मिळविला, तर दुसरीकडे स्मिथ 53 धावांवर नाबाद राहिला. (AUS vs SL 1st T20I: कसुन रजिता याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवला नकोसा रेकॉर्ड, 4 ओव्हरमध्ये लुटवल्या इतक्या धावा)
ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 13 व्या ओव्हरमध्ये लक्षन संदकन (Lakshan Sandakan) गोलंदाजी करत असताना एक असामान्य घटना घडली. वॉर्नरने फलंदाजी करत शॉट सरळ बॉलरकडे मारला जो स्टंपला लागला. यादरम्यान, स्मिथ सिंगल पूर्ण करण्यासाठी धावला, पण वॉर्नरने ती एक धाव नाकारली.संदकनला स्मिथला धावबाद करण्याची संधी होती, पण त्याने हातात चेंडू घेऊन स्टंप्स उखडण्याऐवजी त्याने एका हाताने तो उखडून टाकला आणि स्मिथ थोडक्यात बचावला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि काही यूजर्ससंदकनला त्याच्या या चुकीसाठी ट्रोल करत आहेत.
पहा सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया
गल्ली क्रिकेट!
सुवर्ण संधी गमावली!
आरआयपी क्रिकेट!
दरम्यान, संदकनकडून स्मिथला मिळालेल्या जीवदान श्रीलंकेला महागात पडले. स्मिथने वॉर्नरच्या साथीने शतकी भागीदारी केली आणि संघाला मालिका जिंकून दिली. वॉर्नर आणि स्मिथने यादरम्यान अर्धशतक केले आणि ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने विजय मिळवला.