AUS vs SCO 2nd T20I Live Streaming Online: ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यात आज दुसरा टी-20 सामना, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग

ऑस्ट्रेलियन संघाचे मालिकेवर कब्जा करण्याकडे लक्ष असेल. त्याचबरोबर स्कॉटलंडचा पहिला विजयाकडे डोळे लागले आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवला होता.

AUS vs SCO (Photo Credit - X)

AUS vs SCO 2nd T20I: ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (AUS vs SCO 2nd T20I) शुक्रवारी होणार आहे. हा सामना ग्रेंज क्रिकेट क्लब, एडिनबर्ग येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे मालिकेवर कब्जा करण्याकडे लक्ष असेल. त्याचबरोबर स्कॉटलंडचा पहिला विजयाकडे डोळे लागले आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना स्कॉटलंडने 20 षटकांत 9 गडी गमावून 154 धावा केल्या. संघाने ऑस्ट्रेलियाला 155 धावांचे लक्ष्य दिले.

ट्रॅव्हिस हेडची शानदार खेळी

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने झंझावाती सुरुवात करत 62 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले. ट्रॅव्हिस हेडने 320 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने 25 चेंडूत 12 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 80 धावा केल्या. मात्र, त्याचे शतक हुकले. दुसऱ्या सामन्यावरही त्याच्यावर नजर असेल. (हे देखील वाचा: Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग')

कधी अन् कुठे पाहणार सामना?

ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील दुसरा T20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक संध्याकाळी 6.00 वाजता होईल. तसेच, दोन्ही संघामधील सामना भारतात प्रसारित होणार नाही. त्यामुळे चाहत्यानां हा सामना फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर थेट पाहता येइल.

ऑस्ट्रेलिया संघ: जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, ॲडम झाम्पा, रिले मेरेडिथ, आरोन हार्डी, नॅथन एलिस, कूपर कॉनोली

स्कॉटलंड संघ: जॉर्ज मुंसे, ऑली हेअर्स, ब्रँडन मॅकमुलेन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), मायकेल लीस्क, मार्क वॉट, जॅक जार्विस, चार्ली कॅसल, जॅस्पर डेव्हिडसन, ब्रॅड व्हील, सफियान शरीफ, क्रिस्टोफर सोले, मायकेल जोन्स , ख्रिस ग्रीव्हज, चार्ली टीयर, ब्रॅडली करी



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif