पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि भारतीय टॅक्सी ड्रायव्हर यांचा ब्रिस्बेनमध्ये एकत्र डिनर; यासिर शाह याने 'त्या' खास रात्रीचा अनुभव केला शेअर; पाहा Video
पाकिस्तान क्रिकेट संघातील काही खेळाडू भारतीय ड्रायव्हरसोबत डिनर करताना दिसले आणि याचे फोटो सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाले होते. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शाहने घडलेल्या सर्व घटना क्रम उघडकीस केला.
ऑस्ट्रेलियात (Australia) एका भारतीय टॅक्सी चालकला जेवणाची ऑफर देत पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी सर्वांची मनं जिंकली. पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहे. आतापर्यंत पाकिस्तानसाठी हा दौरा खूप निराशाजनक आहे. टी-20 मालिका 2-0 गमावल्यानंतर पाकिस्तान दोन कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-1ने पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना ब्रिस्बेनच्या (Brisbane) गाब्बा मैदानावर खेळला गेला. सामना गमावल्यानंतर पाकिस्तान संघातील काही क्रिकेटपटूंनी असे काही केले ज्याने भारती क्रिकेटच्या कोट्यावधी चाहत्यांची मनं जिंकली. पाकिस्तान क्रिकेट संघातील काही खेळाडू भारतीय ड्रायव्हरसोबत डिनर करताना दिसले आणि याचे फोटो सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाले होते. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शाह (Yasir Shah) याने या घटनेबद्दल भाष्य केले असून त्याने घडलेल्या सर्व घटना क्रम उघडकीस केला. (स्टीव्ह स्मिथ याने स्वत:ला अनोखी शिक्षा देत 3 किमी धावून गाठले हॉटेल, कारण ऐकल्यावर तुम्हालाही होईल आश्चर्य)
“आम्हाला ब्रिस्बेनमध्ये कोणत्याही भारतीय किंवा पाकिस्तानी रेस्टॉरंटची माहिती नव्हती. इम्रान खान, नसीम शाह, मोहम्मद मुसा, शाहीन शाह आफ्रिदी आणि मी - आम्ही पाच सहकारी बाहेर पडलो तेव्हा आम्ही टॅक्सीला बोलावले, ”असे यासीर शाहने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे. “ड्रायव्हर हा पाजी होता, भारताचा. आम्ही त्याला सांगितले की आम्हाला एका छान रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा. त्याने आम्हाला ओळखले आणि आम्ही क्रिकेटविषयी उर्दूमध्ये गप्पा मारल्या. आम्ही रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो तेव्हा त्याने आमच्याकडून भाडे घेण्यास नकार दिला. मी त्याला म्हणालो, ‘तुम्ही एकतर भाडे घे किंवा आमच्याबरोबर रात्रीचे जेवण घ्या.जेव. आम्ही त्याला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले आणि आमच्याबरोबर फोटज देखील क्लिक केल्याचा त्याला आनंद झाला."
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध एक डाव आणि पाच धावांनी मालिका जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात 185 धावा करणाऱ्या मार्नस लाबुशेन याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधील मालिकेचा दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून खेळला जाणार आहे.