AUS vs PAK 2nd Test: मार्नस लाबुशेन याने केली स्टिव्ह स्मिथ याची नकल, गुरुकडून शिकत आहे शिष्य म्हणाले Netizens

मार्नस लाबुशेन माजी ऑस्ट्रेलियाई कर्णधार स्मिथच्या शैलीत फलंदाजी करताना दिसला. स्मिथ आणि लाबुशेनच्या जोडीने यंदा टेस्ट क्रिकेटमध्ये स्मिथसह तुफान फलंदाजी केली.

स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन (Photo Credit: Getty)

ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला सध्या टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानले जाते. आयसीसी टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या स्मिथसारखे बनण्याची आस आज जगातील सर्व खेळाडू बाळगतात, पण त्याच्या फलंदाजीची शैली कॉपी करणे इतके सोपे नाही. सध्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघात अ‍ॅडिलेडमध्ये (Adelaide) दुसरा टेस्ट सामना खेळला जात आहे. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. जो बर्न्स याला 4 धावांवर शाहीन आफ्रिदी याने यजमान संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) माजी ऑस्ट्रेलियाई कर्णधार स्मिथच्या शैलीत फलंदाजी करताना दिसला. स्मिथ आणि लाबुशेनच्या जोडीने यंदा टेस्ट क्रिकेटमध्ये स्मिथसह तुफान फलंदाजी केली. (AUS vs PAK 2nd Test: अ‍ॅडलेड मॅचआधी डेविड वॉर्नर, जो बर्न्स यांच्यात रंगला 'Rock-Paper-Scissors' चा खेळ, कोण झाला विजयी तुम्हीच पाहा)

पाकिस्तानविरुद्ध मालिकेच्या पहिल्या सामन्यात ब्रिस्बेन (Brisbane) मध्ये लबूशेनने शतक झळकावले होते. त्याने 279 चेंडूत 185 धावा केल्या ज्यामध्ये 20 चौकारांचा समावेश होता. दुसर्‍या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना त्याने स्मिथच्या शैलीत ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडला. यावर सोशल मीडिया यूजर्स त्याचे स्मिथसारख्या फलंदाजी करण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल त्याचे कौतुक केले. पाहा लाबूशेनच्या फलंदाजीचा हा व्हिडिओ:

पाहा नेटकऱ्यांची प्रतिक्रिया:

पुढच्या स्टार वॉर चित्रपटातील कलाकारांना लाईटसबेरचा वापर कसा करावा हे शिकवण्यासाठी स्मिथ आणि लॅबसॅग्ने यांना नियुक्त केले तर आश्चर्य वाटणार नाही.

माझा माणूस स्मिथ होत आहे

तो स्टीव्ह स्मिथ सारखा खेळतो

स्टीव्ह स्मिथ तयारीत आहे...

काही काळापूर्वी संघात आलेला लाबूशेन स्मिथबरोबर बराच वेळ घालवतो. स्मिथला त्याचा गुरुही म्हटले जाते. संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनीही सांगितले कीलाबूशेनचे स्मिथशी खूप चांगले संबंध आहेत, ते एकत्र राहतात, खातो, ड्रिंक्स घेतात आणि क्रिकेटविषयी बोलतात. सध्या अ‍ॅडिलेडमध्ये सुरु असलेल्या मॅचमध्येलाबूशेनने पुन्हा शतकी कामगिरी करत सलामी फलंदाज डेविड वॉर्नर याच्यासाथीने 200 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी डाव आणि पाच धावांनी जिंकली आणि मालिकेत 1-0 अशी अपराजित आघाडी घेतली आहे.