AUS vs PAK 2nd Test: अ‍ॅडलेड मॅचआधी डेविड वॉर्नर, जो बर्न्स यांच्यात रंगला 'Rock-Paper-Scissors' चा खेळ, कोण झाला विजयी तुम्हीच पाहा

पावसानंतर सामना सुरू होण्याची वाट पाहत असलेल्या वॉर्नर आणि बर्न्सचा खेळतानाचा व्हिडिओ Cricket.com.au ने सोशल मीडियावर शेअर केला.

डेविड वॉर्नर आणि जो बर्न्स (Photo Credit: Twitter/@cricketcomau)

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि पाकिस्तान (Pakistan) संघात अ‍ॅडिलेड (Adelaide) मैदानात 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघातील आजपासून सुरु झालेला सामना डे-नाईट आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात डाव आणि 5 धावांनी विजय मिळाला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियासाठी सलामीला आलेले डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि जो बर्न्स (Joe Burns) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'रॉक-पेपर-सिजर्स' खेळात गुंतले. पावसानंतर सामना सुरू होण्याची वाट पाहत असलेल्या वॉर्नर आणि बर्न्सचा खेळतानाचा व्हिडिओ Cricket.com.au ने सोशल मीडियावर शेअर केला. राष्ट्रगान झाल्यावर पावसाला सुरुवात झाली, ज्यामुळे सामना सुरु होण्यास उशीर झाला. याच दरम्यान वॉर्नर वॉर्नर आणि बर्नला हा हँड गेम खेळताना पहिले गेले. (स्टीव्ह स्मिथ याने स्वत:ला अनोखी शिक्षा देत 3 किमी धावून गाठले हॉटेल, कारण ऐकल्यावर तुम्हालाही होईल आश्चर्य)

"चांगला जुना रॉक, याला कोणीही पराभूत करू शकत नाही!" क्रिकेट.कॉम.ऑओने ट्विटरवर असे कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केला. दरम्यान, पहिले फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. फक्त 8 धावांवर ऑस्ट्रेलियाने बर्न्सच्या रूपात पहिली विकेट गमावली. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात 97 धावा करणारा बर्न्सला दुसऱ्या मॅचच्या पहिल्या डावात 4 धावाच करता आल्या. शाहीन आफ्रिदी याने मोहम्मद रिझवान याच्या हाती कॅच आऊट करत बर्न्सला पॅव्हिलिअनचा रास्ता दाखवला.

गुलाबी बॉल टेस्टसाठी यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध विजयी संघात एकही बदल नाही केला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने इम्रान खान याच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास याला संघात स्थान दिले आहे. 19 वर्षीय वेगवान गोलंदाज महंमद मुसा याचा नसीम शाह याच्या जागी संघात समावेश केला आहे. फलंदाज इमाम-उल-हक याने संघात हरीस सोहेल याची जागा घेतली आणि शान मसूदसह तो पाकिस्तानसाठी डावाची सुरुवात करेल. दुसरीकडे, आजवर ऑस्ट्रेलियाने पाच डे-नाईट सामने खेळले आहेत आणि सर्व सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif