AUS vs NZ 2nd Test: स्टीव्ह स्मिथ याचा डेड बॉलच्या निर्णयावरून अंपायरशी झाला वाद, किवी फॅन्सने केली हुटींग, पाहा Video

न्यूझीलंडविरूद्ध सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या लंच ब्रेकआधीच्या अंतिम षटकात दोन डेड बॉलच्या निर्णयावरून स्टिव्ह स्मिथ याचा मैदानावरील अंपायर नाइजेल लॉन्ग यांच्यासह वाद निर्माण झाला. यानंतर स्टेडियमवर उपस्थित किवी चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन सुपरस्टार स्मिथला चिडवायाल सुरुवात केली.

स्टिव्ह स्मिथ अंपायरसह (Photo Credit: Getty Images)

न्यूझीलंड (New Zealand) विरूद्ध सुरू असलेल्या बॉक्सिंग डे (Boxing Day) कसोटी सामन्याच्या लंच ब्रेकआधीच्या अंतिम षटकात दोन डेड बॉलच्या निर्णयावरून स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याचा मैदानावरील अंपायर नाइजेल लॉन्ग (Nigel Llong) यांच्यासह वाद निर्माण झाला. यानंतर स्टेडियमवर उपस्थित किवी चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन सुपरस्टार स्मिथला चिडवायाल सुरुवात केली. न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅग्नर (Neil Wagner) याने स्मिथला दोन शॉर्ट बॉल टाकले जे त्याच्या हिप आणि पाठीला लागले. दोन्ही प्रसंगी स्मिथने एकूण धावांमध्ये बाई जोडण्याचा प्रयत्न केला परंतु ऑस्ट्रेलियनने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून लॉंगने त्याला डेड बॉल म्हणून घोषित केले. निराश झालेल्या स्मिथने या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण मागत अंपायरशी वाद घातला. ड्रेसिंग रूमकडे परत जाताना डोकं हलवले आणि अंपायरच्या स्पष्टीकरणाने आपण सहमत नसल्याचे दर्शवून दाखवले. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. (AUS vs NZ 2nd Test: मार्नस लाबूशेन याच्यासाठी मेलबर्न टेस्ट ठरेल खास; डॉन ब्रॅडमन, स्टिव्ह स्मिथ यांच्या एलिट यादीत सामिल होण्याची संधी)

सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आऊट झाल्यावर स्मिथ मैदानावर आला. दुपारच्या जेवणापूर्वी वॅगनरने एका षटकात स्मिथला 5 बाउन्सर फेकले, त्यातील दोन त्याच्या कंबर, पाठ आणि छातीवर लागले. एक बाउन्सर त्याच्या हाताला लागला. वॅग्नरच्या आक्रमक गोलंदाजीने स्मिथला चकित केले. इतकेच नाही, स्मिथ जेव्हा फलंदाजीला मैदानात आला तेव्हा किवी फॅन्सने हूटिंगने त्याचे स्वागत केले, काही चाहत्यांनी सेंड पेपर हवेत लहरवाले आणि त्याला चीटरही म्हटले. पाहा हा व्हिडिओ:

अंपायरशी झाला वाद

ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांपेक्षा मेलबर्नच्या मैदानावर सर्वाधिक किवी चाहते बसले होते, ज्यांनी आठवड्या अगोदर या सामन्यासाठी 16000 तिकिटे खरेदी केली होती. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय ट्रेंट बोल्ट याने योग्य सिद्ध केला. त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज जो बर्न्सला पहिल्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर शानदार इन-स्विंग बॉलवर बोल्ड केले. लंचच्या अगदी अगोदर वॅगनरने वॉर्नरलाही 41 धावांवर पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now