AUS vs NZ 1st Test: पर्थ कसोटीत टीम साउदी याचा आक्रामक अंदाज, जो बर्न्स याला फेकून मारला चेंडू, पाहा Video

पर्थमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसादरम्यान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउथी याने गोलंदाजीत अत्यधिक आक्रमकता दाखविली. सातव्या षटकातील पहिल्या चेंडूवर वर साऊथीने बर्न्सवर बॉल टाकण्याबाबत डेव्हिड वॉर्नर याने आक्षेप घेतला.

टीम साउथी-जो बर्न्स (Photo Credit: Facebook)

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेचा पहिला सामना पर्थच्या (Perth) वाका (WACA) मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियासाठी डेविड वॉर्नर (David Warner) आणि जो बर्न्स (Joe Burns) यांनी चांगली सुरुवात केली. पर्थमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसादरम्यान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउदी (Tim Southee) याने गोलंदाजीत अत्यधिक आक्रमकता दाखविली. सातव्या षटकातील पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज बर्न्सने चेंडूला डिफेन्ड करत गोलंदाजाकडे पाठवले. क्रीजच्या थोड्याबाहेर असताना साऊदीने बर्न्सला धावबाद करण्याच्या हेतूने चेंडू फेकला, पण फलंदाज स्टंपच्या समोर उभा असल्याने चेंडू त्याला लागला. बर्न्सने साऊथीच्या थ्रोच्या संदर्भात अंपायरकडे हावभाव करत काही सांगितले. परंतु बर्न्सवर बॉल टाकण्याबाबत डेव्हिड वॉर्नर याने आक्षेप घेतला.

याच्यानंतर, अंपायर अलेम डार यांनी अखेर हस्तक्षेप केला आणि परिस्थिती आणखी खराब होणार नाही याची काळजी घेतली. थ्रो बर्न्सच्या हाताला लागला आणि किवी गोलंदाज पूर्ण घटनेबद्दल माफी न मागता परतला.  दुसऱ्या टोकाला उपस्थित असणाऱ्या वॉर्नरने साऊदीच्या कृतीवर आक्षेप घेतला, वॉर्नरने साऊथीसह बोलणे केले कारण त्याचा साथीदार क्रीजच्या बाहेर साधारण दोन इंच होता आणि तो थ्रो अनावश्यक होता. याच्यावर किवी गोलंदाज म्हणाला की बर्न्स 'विकेटसमोर' उभा होता आणि असे सुचवले की यात फलंदाजांची चूक आहे, परंतु वॉर्नरने सहमती दर्शवली नाही. क्रिकेट डॉट कॉमने या घटनेचा व्हिडिओ क्लिपही शेअर केला. पाहा इथे:

दरम्यान, नंतर बर्न्सला कॉलिन डी ग्रँडहोलम याने एलबीडब्ल्यूने बाद केले. त्याने 1 चौकाराच्या मदतीने 42 चेंडूंमध्ये 9 धावा केल्या आणि डेव्हिड वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी रचली. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकला. न्यूझीलंडकडून सामन्यात लोकी फर्ग्युसन या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करीत आहे. पर्थमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात दोन्ही संघाने काळी पट्टी बांधून मैदानात प्रवेश केला. व्हाइट आयलँडवरील ज्वालामुखीच्या विस्फोटात ठार झालेल्यांना त्यांनी याद्वारे श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा म्हणाला की, देशातील जंगलात आग लागल्यामुळे शहरातील प्रदूषणाच्या धूराने त्याला भारतात खेळण्याची आठवण करून दिली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif