AUS vs NZ 1st Test: पर्थ डे-नाईट टेस्ट ठरणार अंपायर अलीम डार यांच्यासाठी खास, स्टीव्ह बकनर यांच्या रेकॉर्डवर नजर, वाचा सविस्तर

या मॅचमध्येडार सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये अम्पायरिंग करण्याचा विक्रम मोडू शकतात. सध्या हा विक्रम स्टीव्ह बकनर यांच्या नावावर आहे.

अलीम डार प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credits: Getty Images)

गुरुवारी पर्थमध्ये सुरू होणार्‍या ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पहिल्या कसोटी सामना पाकिस्तानचे प्रसिद्ध अंपायर अलीम डार (Aleem Dar) यांच्यासाठी खास असणार आहे. या मॅचमध्येडार सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये अम्पायरिंग करण्याचा विक्रम मोडू शकतात. सध्या हा विक्रम स्टीव्ह बकनर (Steve Bucknows) यांच्या नावावर आहे. 51 वर्षीय डार यांनी काही वर्षे पाकिस्तानकडून क्रिकेट खेळल्यानंतर अंपायर बनण्याची निवड केली. अलीम डार पहिल्या कसोटी सामन्यात 129 व्या कसोटीत सामन्यात अम्पायरिंग करतील. या दरम्यान ते फील्ड अंपायर असतील. 2003 मधील इंग्लंड आणि बांग्लादेशविरुद्ध ढाका सामन्यातून त्यांनी पदार्पण केले होते.

2000 मध्ये पाकिस्तानआणि श्रीलंकाविरुद्ध वनडे मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात करत डारने 207 वनडे सामन्यांमध्ये अंपायर म्हणून कामगिरी बजावली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या रुडी कोर्टझेन यांनी या फॉर्मेटमध्ये केलेल्या एकूण 209 सामन्यांचा विक्रम मोडण्यापासून ते फक्त दोन सामने लांब आहेत. डारने 46आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्येही अम्पायरिंग केली आहेत. आयसीसीच्या निवेदनात ते म्हणाले की, "हा असा प्रवास होता ज्याबद्दल मी कधीच विचार केला नव्हता. माझ्यासाठी, जेव्हा मी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या सामन्यांच्या दरम्यान पंचांवर उतरेन तेव्हा हा एक महत्वाचा क्षण असेल.

ते पुढे म्हणाले की स्टीव्ह माझे आयडल आहे आणि आता मी त्यांचा विक्रम मोडणार आहे. गेल्या 20 वर्षांत मी बरेच काही पाहिले आहे, ज्या मध्ये ब्रायनने केलेल्या नाबाद 400 धावा आणि2006 मधील दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सामन्यातील 434 धावांचा सामना.