AUS vs IND 3rd Test 2021: बापरे! हनुमा विहारीची संथ खेळी, SCG येथील दुसऱ्या डावात नाबाद 15 धावांच्या खेळीत केला इतक्या चेंडूंचा केला सामना

पहिले रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराने जबरदस्त खेळी केली आणि सामना ड्रॉ करण्यात महत्वाची भूमिका बजावली. विशेषत: विहारीने दुसऱ्या डावात खूप संयम दर्शविला आहे. विहारीने जबरदस्त फलंदाजी केली आणि धावता येत नसतानाही तो क्रीजवर कायम राहिला.

हनुमा विहारी (Photo Credit: Twitter/ICC)

AUS vs IND 3rd Test 2021: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Team) सिडनी कसोटी (Sydney Test) वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आणि त्यांना त्यात यश देखील मिळाले. पहिले रिषभ पंत (Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजाराने जबरदस्त खेळी केली. त्यानंतर हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि अश्विनच्या (Ashwin) अर्धशतकी भागीदारीने सामना ड्रॉ करण्यात महत्वाची भूमिका बजावली. विशेषत: विहारीने दुसऱ्या डावात खूप संयम दर्शविला आहे. विहारी फलंदाजीला आला तेव्हा तो पूर्ण तंदुरुस्त होता पण धावा घेताना तो जखमी झाला आणि त्याच्या पायाचे स्नायू ताणले गेले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेदरम्यान अनेक भारतीय खेळाडू आधीच जखमी झाले आहेत, त्यामुळे हनुमा विहारीच्या दुखापतीमुळे त्यात आणखी भर पडताना दिसत आहे आणि असे झाल्यास तो पुढे ब्रिस्बेन कसोटी सामन्यात फलंदाजी करू शकणार नाही. विहारीने जबरदस्त फलंदाजी केली आणि धावता येत नसतानाही तो क्रीजवर कायम राहिला. यादरम्यान विहिरीने आपल्या नाबाद खेळत चेंडू खेळले आणि फक्त धावाच केल्या. विहारीने आता कसोटी क्रिकेटमधील 100 हुन अधिक बॉल खेळत डावात सर्वात कमी स्ट्राईक रेटची नोंद केली आहे. (IND vs AUS 3rd Test 2021: रिषभ पंतचा तडाखा, विहारी-अश्विनच्या चिवट फलंदाजीने भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी सिडनी टेस्ट ड्रॉ)

विहारी फक्त बचावात्मक शॉट खेळत राहिला आणि एक-एक धावा केल्या. त्याने 10 चेंडूत फक्त 6 धावा केल्या होत्या तर दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेंडूत 161 नाबाद 23 धावा करून परतला. भारताचा अर्धा संघ तंबूत परतल्यावर विहारी आणि अश्विनने 200हुन अधिक चेंडू खेळून काढले आणि सिडनी टेस्ट अनिर्णित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. सामना वाचवण्यासाठी त्याने रविचंद्रन अश्विनसह संघर्ष केला ज्याच्या परिणामी त्याच्या खेळीची जोरदार प्रशंसा सध्या सोशल मीडियावर यूजर्सकडून होत आहे. सामन्याच्या अंतिम दिवशी अश्विनने 110 चेंडूंत 33 धावा केल्या आणि नाबाद परतला. याशिवाय, दुसऱ्या डावात भारताकडून रिषभ पंतने तडाखेदार खेळी केली. पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात चौथ्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी झाली ज्याने टीमच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर धावसंख्येची गती कमी झाली ज्यामुळे संघाला सामना अनिर्णित करावा लागला.

दुसरीकडे, तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी करताना 338 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव 244 धावांवर संपुष्टात आला आणि यजमान संघाला पहिल्या डावाच्या जोरावर 94 धावांची आघाडी मिळाली. आणि दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाने 312 धावा करत डाव घोषित केला. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 407 धावांचं तगडं आव्हान मिळालं.