केएल राहुलने कथित गर्लफ्रेंड अथिया शेट्टीच्या ओव्हरसाईज शर्टवर केली मजेदार कमेंट, फॅन्स म्हणाले तुझा आहे शर्ट?

कताच अथियाने ओव्हरसाईज शर्ट घातलेला एक फोटो शेअर केला आहे. ज्याच्यावर राहुलच नव्हे तर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अथियाने ओव्हरसाईज पांढरा शर्ट परिधान केलेले फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले

केएल राहुल आणि अथिया शेट्टी (Photo Credit: Instagram)

प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) सध्या एका फोटोमुळे चर्चेत आहे. अथियाचा हा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. नुकतच तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केले आहे. अथिया आणि क्रिकेटपटू केएल राहुलच्या (KL Rahul) अफेअरची बर्‍याचदा चर्चा होत असते. मात्र दोंघांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अथियाने नुकताच शेअर केलेला फोटो त्यांच्या नात्याकडे इशारा करत आहे. नुकताच अथियाने ओव्हरसाईज शर्ट घातलेला एक फोटो शेअर केला आहे. ज्याच्यावर राहुलच नव्हे तर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अथियाने ओव्हरसाईज पांढरा शर्ट परिधान केलेले फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आणि लिहिले, 'पार्टी ऑफ टू' आणि साशा जयरामला टॅग केले. तिच्या या फोटोवर राहुलने लिहिले, 'चांगला शर्ट आहे'. राहुल आणि अभिनेत्री अथियाचे अफेअरबाबत बरेच दिवस चर्चा होत आहे आणि राहुलने चाहत्यांना याबद्दल बोलण्याची आणखी एक संधी दिली. (आजच्या दिवशी केएल राहुलने ठोकले होते IPL मधील सर्वात जलद अर्धशतक, पाहा भारतीय फलंदाजाचा तुफानी डाव)

राहुलने केलेली कमेंट पाहून फॅन्सही मागे राहिले नाही आणि त्यांनी दोघांची फिरकी घ्यायला सुरुवात केली. राहुलच्या टिप्पणीवर एका चाहत्याने लिहिले "भाई तुमची शर्ट आहे का?" तर दुसर्‍या फॅनने लिहिले- "हो मला माहित आहे हा तुमचा आहे." राहुलच्या कमेंटवर अथियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

View this post on Instagram

 

party of two! 📸 ft with @sashajairam

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty) on

राहुल आणि अथियाच्या डेटिंगच्या बातम्या गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. अलीकडेच अथियाच्या वाढदिवशी राहुलने एक फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या. तेव्हापासून दोघेही चर्चेत राहिले आहे. एका न्यूज पोर्टलशी बोलताना अथियाचे वडील सुनील शेट्टी म्हणाले,"मला अहानची (सुनीलचा मुलगा) गर्लफ्रेंड आवडते आणि अथिया ज्याच्या सोबत आहे तो आवडतो. मला यात कोणतीही अडचण नाही आणि मला मनालाही यात कोणतीही समस्या नव्हती. ते आनंदी आहेत." दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. मागील वर्षी, ते दोघे सुट्टीसाठी मालदीवमध्ये गेले होते जेथील त्यांनी मित्रांसह फोटो सामायिक केले होते.