Asia Cup 2020: आशिया चषक होणारच! पूर्व निर्धारित वेळेनुसार श्रीलंका किंवा युएईमध्ये होणार स्पर्धा, अफवांवर PCB CEO वसीम खानचे स्पष्टीकरण

सध्या स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगसाठी विंडो तयार करण्यासाठी हा कार्यक्रम स्थगित केला जाईल अशा अफवाह खान यांनी फेटाळल्या.

वासिम खान (Photo Credits: Getty Images)

या वर्षाच्या अखेरीस श्रीलंका (Sri Lanka) किंवा युएई (UAE) या दोन्ही देशांमध्ये आशिया चषक (Asia Cup) निश्चित होईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान (Wasim Khan) यांनी ठामपणे सांगितले. सध्या स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगसाठी (IPL) विंडो तयार करण्यासाठी हा कार्यक्रम स्थगित केला जाईल अशा अफवाह खान यांनी फेटाळल्या. “आशिया चषक पुढे जाईल. पाकिस्तान संघ (Pakistan Cricket Team) 2 सप्टेंबरला इंग्लंडहून परतला आहे. त्यामुळे आम्ही सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा घेऊ,” कराची येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले. “अशा काही गोष्टी आहेत जे वेळेवर स्पष्ट होतील. आम्हाला आशिया चषक होण्याची आशा आहे कारण श्रीलंकेमध्ये कोरोना व्हायरसची फारशी प्रकरणे आढळली नाहीत. जर ते ते करू शकत नाहीत तर युएई देखील तयार आहे.” पाकिस्तान यंदा आशिया चषकचे आयोजन करणार आहे. मुळतः पाकिस्तान बोर्डाला ते स्वतःच्या देशात आयोजित करायचे होते, मात्र भारतीय संघ तिथे जाणार नसल्याने सध्या दुसऱ्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. (श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आशिया चषक आयोजित करण्याचा BCCI ने नाकारला अहवाल, यावर अद्याप कोणतीही चर्चा नाही)

या कार्यक्रमाचे मूळ यजमान असलेल्या पाकिस्तानने पुढील प्रादेशिक स्पर्धेचे आयोजन करण्याच्या मोबदल्यात श्रीलंकेला हे आयोजन करण्यास सहमती दर्शविली असल्याचे खान यांनी सांगितले. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ठरल्याप्रमाणे टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन न झाल्यास पाकिस्तान बोर्ड त्या विंडोमध्ये क्रिकेट खेळण्याच्या पर्यायांवर काम करत असल्याचेही त्यांनी पुष्टी केली. “घरच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्यानंतर आम्ही डिसेंबरमध्ये न्यूझीलंडला जाणार आहोत. दक्षिण आफ्रिका जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दोन किंवा तीन कसोटी आणि टी -20 सामने खेळण्यासाठी तयार आहे.”

दुसरीकडे, पाकिस्तान सुपर लीगबद्दल बोलताना खान म्हणाले की पीसीएलचे उर्वरित पाच सामने पूर्ण करण्यासाठी बोर्ड नोव्हेंबरच्या विंडोकडे पहात आहे. कोविड-19 च्या परिस्थितीमुळे आणि खर्च जवळजवळ एक अब्ज रुपयांनी कमी झाल्याने मंडळाने वार्षिक अंदाजपत्रकात बदल केल्याचही खान म्हणाले.