Ashes 2021-22 Schedule: इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या अॅशेस मालिकेचे वेळापत्रक जाहीर; ब्रिस्बेनमध्ये शुभारंभ तर 26 वर्षानंतर पर्थ येथे रंगणार अंतिम सामना
अॅशेस मालिकेचे शुभारंभ 8 डिसेंबरपासून सुरू होईल आणि पहिला सामना ब्रिस्बेनच्या गब्बा मैदानावर खेळला जाईल. याशिवाय 26 वर्षांत पहिल्यांदा मालिकेचा अंतिम सामना सिडनीऐवजी पर्थ येथे खेळला जाईल.
Ashes 2021-22 Schedule: इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान होणाऱ्या बहुचर्चित अॅशेस मालिकेचे वेळापत्रक (Ashes Series Fixtures) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे. अॅशेस मालिकेचे (Ashes Series) शुभारंभ 8 डिसेंबरपासून सुरू होईल आणि पहिला सामना ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा मैदानावर खेळला जाईल. याशिवाय 26 वर्षांत पहिल्यांदा मालिकेचा अंतिम सामना सिडनीऐवजी पर्थ (Perth) येथे खेळला जाईल. 2021-22 अॅशेस मालिकेचा चौथा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर तर अंतिम सामना पर्थ येथे होईल. अॅशेस मालिकेचे सामने पर्थ, ब्रिस्बेन, अॅडलेड, मेलबर्न (Melbourne) आणि सिडनी येथे होतील. अॅशेसपूर्वी अफगाणिस्तान संघ एक कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना 27 नोव्हेंबरपासून आयोजित केला जाईल. कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर अफगाणिस्तान संघ पहिल्यांदा कांगारू संघाविरुद्ध टेस्ट मॅच खेळेल. (Steve Smith नाही तर टिम पेन याच्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पदासाठी Ian Chappell कडून ‘या’ खेळाडूला पाठिंबा, म्हणाले- ‘आता वेळ पुढे पाहण्याची’)
दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यंदाच्या वर्षअखेरीस होणाऱ्या संपूर्ण अॅशेस मालिकेसाठी प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होऊ शकतील अशी आशा व्यक्त केली आहे. तथापि, इतर देशांतून येणाऱ्या प्रेक्षकांच्या निर्णयाबाबत सरकारच्या सल्ल्याचे ते पालन करतील, असा मंडळाचा आग्रह होता. ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले म्हणाले की, “अॅशेसचे आयोजन करण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. अखेरची अॅशेस मालिका एक विलक्षण होती ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि मी आशा करतो की यंदाही असेच होईल. यावेळी आम्ही संघांच्या प्रवासासाठी आणि इतर सर्व गोष्टींसाठी सरकारच्या नियमांचे पालन करू.”मालिकेला उशीर होण्याचे कारण ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या भारत दौर्यावर येण्याचे सांगितले जात आहे. भारतातून परतल्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागेल. कांगारू संघ टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर जाणार आहे. यासोबतच, ऑस्ट्रेलियाचा महिला संघ सर्व फॉरमॅटमध्ये होणाऱ्या अॅशेस मालिकेचा एकमेव कसोटी सामना 27 जानेवारीपासून खेळेल.
महिला अॅशेस
दुसरीकडे, अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी आणि अॅशेस मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ न्युझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध नऊ टी-20 व एकदिवसीय सामने खेळणार आहे. कांगारू टीम न्यूझीलंड विरोधात तीन वनडे आणि एक टी-20 सामना खेळणार आहे तसेच श्रीलंकेविरुद्ध पाच टी -20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.