Ashes 2021-22: ऑस्ट्रेलिया विरोधात तणाव वाढला असताना बेन स्टोक्सने चोरून-चोरून पहिला शेवटच्या ओव्हरचा थरार, रिअक्शन झाली व्हायरल, पहा व्हिडिओ

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पावसाने बाधित या सामन्याच्या शेवटच्या क्षणी कांगारू संघाला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज होती, यामुळे डगआउटमध्ये बसलेला बेन स्टोक्स खूप तणावात दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Ashes 2021-22: ऑस्ट्रेलिया विरोधात तणाव वाढला असताना बेन स्टोक्सने चोरून-चोरून पहिला शेवटच्या ओव्हरचा थरार, रिअक्शन झाली व्हायरल, पहा व्हिडिओ
बेन स्टोक्सची रिअक्शन (Photo Credit: Twitter)

Ashes 2021-22: अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) रविवारी आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळाला ज्यामध्ये इंग्लंडचा (England) संघ पराभव टाळण्यात यशस्वी ठरला. सामन्याच्या शेवटच्या षटकाने असे रोमांचक वळण आणले की इंग्लंडचा (England) अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही (Ben Stokes) चोरून-चोरून सामना पाहताना दिसला. मात्र, अखेरीस जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी अखेरची विकेट सांभाळत संघाला क्लीन-स्वीपपासून वाचवले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2022 03:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).