Ashes 2021-22: बेन स्टोक्सच्या नो-बॉलने वादाला तोंड फुटले, सायमन टॉफेल यांनी थर्ड अंपायरला फटकारले; इंग्लंडची महागात पडली चूक, पहा Video
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ब्रिस्बेनच्या गब्बा येथे पहिल्या अॅशेस कसोटी सामन्याच्या आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. मानसिक तणावामुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतलेल्या बेन स्टोक्सच्या पहिल्या ओव्हर पहिल्याच षटकामुळे वादाला तोंड फुटले आहे. ब्रिटिश अष्टपैलूला पहिल्याच षटकात डेविड वॉर्नरची मूल्यवान विकेट मिळाली असती जर त्याने नो-बॉलवर वॉर्नरला क्लीन बोल्ड नसते.
ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यात ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) येथे पहिल्या अॅशेस कसोटी (Ashes Test) सामन्याच्या आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. मानसिक तणावामुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतलेल्या बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) पहिल्या ओव्हर पहिल्याच षटकामुळे वादाला तोंड फुटले आहे. ब्रिटिश अष्टपैलूला सुरु असलेल्या पहिल्या अॅशेस कसोटीच्या पहिल्याच षटकात डेविड वॉर्नरची (David Warner) मूल्यवान विकेट मिळाली असती जर त्याने नो-बॉलवर वॉर्नरला क्लीन बोल्ड नसते. स्टोक्सने त्याच्या पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर वॉर्नरचा त्रिफळा उडवला होता, पण टीव्ही रिप्लेमध्ये तो नो-बॉल असल्याचे दिसून आले आणि त्यामुळे वॉर्नरला 17 धावांवर जीवदान मिळाले. स्टोक्सचे त्या षटकातील पहिले चार चेंडू नो-बॉल असल्याचे रिप्लेमध्ये दिसून आल्याने गोंधळ सुरू झाला. तथापि पंचांनी केवळ वॉर्नरला टाकलेला चेंडू घोषित केला. आयसीसीच्या नियमांनुसार, टीव्ही अंपायरला प्रत्येक चेंडू तो नो-बॉल आहे की नाही हे पाहावे लागते, त्यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. (Ashes 2021-22: अॅशेस मालिकेवर कोरोनाचा फटका, शेवटच्या कसोटी सामन्याचे ठिकाण बदलले, जाणून घ्या पर्थऐवजी कुठे होणार सामना)
आयसीसीचे माजी एलिट अंपायर सायमन टॉफेल यांनी चॅनल 7 ला सांगितले की, “त्यांनी प्रत्येक चेंडू तपासायला हवे. मी ते स्पष्ट करू शकत नाही.” दुसरीकडे स्टोक्सची ही चूक इंग्लंडला चांगलीच महागात पडली असून वॉर्नरने 31 वे कसोटी अर्धशतक झळकावले आहे. ESPNCricinfo च्या बातमीनुसार या मालिकेचे होस्ट ब्रॉडकास्टर चॅनल 7 ने पुष्टी केली की सामना सुरू होण्यापूर्वी टीव्ही अंपायरसाठी प्रत्येक चेंडू तपासण्यासाठी वापरल्या जाणार्या सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड होता आणि त्यामुळे सामन्यात जुने तंत्रज्ञान वापरले जात होते. ज्यावर फक्त तेच चेंडू तपासले जातात, ज्यावर विकेट पडतात. 2019 मध्ये आयसीसीने पहिल्यांदा प्रत्येक चेंडू नो-बॉल आहे की नाही हे तपासले पाहिजे यासाठी पाऊल उचलले होते. यानंतर 2020 मध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेदरम्यान प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली.
दरम्यान, ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण फलंदाजांच्या निराशाजनक खेळीमुळे संपूर्ण संघ अवघ्या 147 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला. यजमान ऑस्ट्रेलियाचीही खराब सुरुवात झाली आणि मार्कस हॅरिस 11 धावा करून बाद झाला. पण त्यानंतर मार्नस लाबूशेन आणि डेविड वॉर्नर यांनी शतकी भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. या दरम्यान सध्या वॉर्नर आणि लाबूशेन यांनी अर्धशतकी खेळी करून इंग्लिश गोलंदाजांवर चांगलाच दबाव आणला आहे. 43 ओव्हरनंतर वॉर्नर 65 तर लाबूशेन 63 धावा करून खेळत असून कांगारू संघाने 141 धावा केल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)