Ashes 2019: डेविड वॉर्नर याने केली '0' ची हॅटट्रिक, जाणून घ्या का मैदानातून हसत बाहेर पडला

ब्रॉडच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू झाला. यासह त्याची 'शून्याची' हॅटट्रिकही पूर्ण झाली आहे. यावेळी वॉर्नर शून्यावर बाद झाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते.

डेविड वॉर्नर (Photo Credit: @englandcricket/Twitter)

इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील मॅनचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे चाललेल्या चौथ्या अ‍ॅशेस (Ashes) कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने कायम वर्चस्व कायम ठेवले आहे, पण एका खेळाडूचे भविष्य मात्र काही बदलले नाही. डेव्हिड वॉर्नर (David Warner) असे त्याचे नाव आहे. आयपीएल (IPL) मधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि नंतर वर्ल्डकप 2019 नंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलेल्या खेळाडूचे काय झाले, असा प्रश्न सध्या त्याचे चाहते विचारात आहे. चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर तो दुसऱ्या डावातदेखील शून्यावर बाद झाला आहे. पण, यावेळी तो हसत हसत मैदानातून बाहेर गेला, का? चला संपूर्ण प्रकरण आणि आकडेवारी जाणून घ्या. (Ashes 2019: मँचेस्टर टेस्टमध्ये ड्रेसिंग रूममधून बाहेर पडताना डेव्हिड वॉर्नरला चाहते म्हणाले 'चीटर', वॉर्नर ने खास अंदाजात दिले प्रत्युत्तर, पहा Video)

शनिवारी वॉर्नर चौथ्या अ‍ॅशेसच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावात फलंदाजीसाठी बाहेर आला तेव्हा त्याचा संघ मजबूत स्थितीत होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाच्या आधारावर 196 धावांची मिळवली होती, पण, वॉर्नर परत आला आणि डावाच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याचा पुन्हा बळी गेला. ब्रॉडच्या या शानदार चेंडूवर तो एलबीडब्ल्यू झाला. यासह त्याची 'शून्याची' हॅटट्रिकही पूर्ण झाली आहे. तिसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावातदेखील वॉर्नर शून्यावर बाद झाला आणि आणि सध्याच्या टेस्टच्या दोन्ही डावात तो शून्यावर बाद झाला आहे. यावेळी वॉर्नर शून्यावर बाद झाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते, तो खेळपट्टीवरून परतताना हसत हसत मैदानातून बाहेर गेला आणि याचे कारण होते ब्रॉड.

यंदाच्या मालिकेत ब्रॉडने सहाव्या वेळी वॉर्नरला बाद केले आहे. तो ब्रॉडच्या गोलंदाजीवर पुन्हा पुन्हा बाद होत आहे आणि त्यापैकी तो सलग तीन वेळा शून्यावर आउट झाला आहे, कदाचित या असहायतेची एक झलकही त्याच्या हसण्यात दिसली. वॉर्नरने शेवटच्या आठ सामन्यांमध्ये म्हणजेच आतापर्यंतची संपूर्ण मालिकेमध्ये फक्त एकदाच दुहेरी आकडा गाठला आहे. तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात 61 धावांचा डाव वगळता त्याला उर्वरित सामन्यात दुहेरी आकडादेखील ओलांडता आला नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif