Ashes 2019: स्टीव्ह स्मिथ याला हूट करणाऱ्या इंग्लंड चाहत्यांची ICC ने उडवली खिल्ली, 'कर्मा' म्हणत केले 'हे' मजेदार Tweet
आतापर्यंत स्मिथने पाच डावांमध्ये 134.20 च्या सरासरीने 671 धावा केल्या आहेत. स्मिथच्या कामगिरीवर आयसीसीही खूपच प्रभावित दिसत आहे. आयसीसीने स्मिथचा डाव कर्माशी जोडला आणि त्याच्यासाठी एक छान पोस्ट शेअर केली.
यंदा स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला त्याच्या अॅशेस (Ashes) मालिकेतील कामगिरीमुळे बहुदा लक्षात ठेवले जाईल. बंदीनंतर या मालिकेच्या माध्यमातून टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या खेळाडूला आपल्यावरील कलंक धुण्याची संधी पूर्णपणे सोडता आली आणि आपल्या खेळाने जगाची मने जिंकली. अॅशेस सुरू होण्याच्या वेळी स्मिथची थट्टा करणारे इंग्लिश क्रिकेट चाहते आता त्यांची टाळ्या वाजवत आहेत. चेंडूशी छेडछाड कारण्याप्रकरणी स्मिथसह डेविड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. तिघांसाठी पुनरागमन करणे कठीण होते पण, त्यांनी स्वतःला तयार केले. एकीकडे, वॉर्नरने विश्वचषक गाजवले तर स्मिथने सध्या अॅशेस मालिकेत आपले वर्चस्व कायम ठेवले आहेत. (Ashes 2019: चौथ्या टेस्टमध्ये स्टीव्ह स्मिथ याचे विक्रमी अर्धशतक; विराट कोहली, ब्रायन लारा यांची बरोबरी करत केली अनेक विक्रमांची नोंद)
त्याच्या अविश्वसनीय आणि अमानवीय कामगिरीमुळे त्याला हूट करणाऱ्या इंग्लंड चाहत्यांची बोलती बंद करण्यास यश आले आहेत. आता स्मिथसह आयसीसीने देखील इंग्लिश प्रेक्षकांची एका ट्विटने बोलती बंद केली. आतापर्यंत स्मिथने पाच डावांमध्ये 134.20 च्या सरासरीने 671 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतक आणि 2 अर्धशतक यांचा समावेश आहे. या कामगिरीनंतर टेस्टमध्ये त्याची सरासरी 64.81 झाली आहे. अजून एक सामना बाकी आहे आणि त्यातही त्याने काहीतरी खास करण्याची अपेक्षा केली जात आहे. स्मिथच्या कामगिरीवर आयसीसीही (ICC) खूपच प्रभावित दिसत आहे. आयसीसीने स्मिथचा डाव कर्माशी जोडला आणि त्याच्यासाठी एक छान पोस्ट शेअर केली. 'कर्मा' कॅप्शन देत आयसीसीने एका चाहत्याचे छायाचित्र जोडले ज्याने स्मिथचा रडणारा मुखवटा घातला होता.
मालिकेच्या पहिल्या कसोटीपासूनच त्याने आपली छाप पाडली. बर्मिंघम येथील पहिल्या सामन्यात त्याने दोन शतके नोंदविली. यानंतर लॉर्ड्स येथे 92 धावा केल्या. दुखापतीमुले स्मिथ दुसऱ्या डावात खेळू शकला नाही. शिवाय, तिसऱ्या सामन्यालादेखील त्याला मुकावे लागले. पण, चौथ्या कसोटीत संघात पुनरागमन करत पहिल्या डावात 211 तर दुसऱ्या डावांत 82 धावा केल्या.