Ashes 2019: डेविड वॉर्नर आऊट झाल्यावर चाहत्यांनी दाखवले Sandpaper, काढली जुन्या जखमांवरची खपली, पहा Video
इंग्लंड-ऑस्ट्रेलियामधील अॅशेस मालिकेच्या पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली आहे. आपल्या पहिलीच डावात स्वस्तात बाद झाल्यावर पॅव्हिलिअनकडे परतताना इंग्लंडच्या चाहत्यांनी डेविड वॉर्नरला मैदानावरून परत जाताना काही प्रेक्षकांकडून त्याला सॅंडपेपर दाखवण्यात आले.
इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघामधील अॅशेस (Ashes) मालिकेच्या पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने टॉस जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही चांगली झाली नाही. कांगारूंचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) फक्त 2 धावा करत माघारी परतला. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Braod) याने वॉर्नरला माघारी धाडले. विश्वचषकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या वॉर्नरकडून ऑस्ट्रेलियाला चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. पण अॅशेसमधील पहिल्याच डावात तो स्वस्तात परतला. चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी एक वर्षाच्या बंदीनंतर वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. (Ashes 2019: बॉल टेंपरिंगच्या मालिकेनंतर टीम पेन याच्या Hand Shake परंपरेवर जो रूट आणि प्रशिक्षक ट्रेवर बेलिस निराश)
दरम्यान, अॅशेसमध्ये आपल्या पहिलीच डावात स्वस्तात बाद झाल्यावर पॅव्हिलिअनकडे परतताना इंग्लंडच्या चाहत्यांनी परत एकदा चिडवण्यात आले. वॉर्नर मैदानावरून परत जाताना काही प्रेक्षकांकडून त्याला सॅंडपेपर दाखवण्यात आले. याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. चाहत्यांकडून वॉर्नरला असा प्रतिसाद मिळणे हे त्याच्या दुखण्यावर मीठ चोळण्यासारखे आहे. अपेक्षेप्रमाणे इंग्रजी चाहत्यांनी या तिघांचे उदंड स्वागत केले. खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरताच चाहत्यांनी सँडपेपर दाखवले. चाहत्यांकडून केपटाऊनमध्ये काय घडले याची आठवण करून देणारे बॅनर देखील दाखवण्यात आले.
ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका जास्त महत्वाची आहे. मागील वर्षी दक्षिण आफ्रिका विरुद्ध दौऱ्यात चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणामुळे त्यांची नाचक्की झाली. त्यानंतर मायदेशी त्यांना भारत विरुद्ध टेस्ट मालिका देखील गमवावी लागली. विश्वचषक दरम्यान देखील वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ याला चाहत्यांनी चिडवले होते. यंदाच्या ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट संघात वॉर्नरसह स्टिव्ह स्मिथ आणि कॅमेरून बेनक्राफ्ट यांचे बंदीनंतर पुनरागमन झाले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)