Asghar Afghan Breaks MS Dhoni Record: महेंद्र सिंह धोनीचा 'हा' विक्रम अखेर मोडला; अफगाणिस्तान संघाचा कर्णधार असगर अफगान याची मोठी कामगिरी

या मालिकेवर विजय मिळवत आफगाणिस्तान संघाचा कर्णधार असगर अफगानने (Asghar Afghan) भारताचा माजी कर्णधार महेद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडीत काढला आहे.

Afghanistan Team (Photo Credit: ICC)

झिम्बॉब्वे (Zimbabwe) विरुद्ध टी-20 मालिकेत आफगाणिस्तानच्या संघाने (Afghanistan) 3-0 असा विजय मिळवला आहे. या मालिकेवर विजय मिळवत आफगाणिस्तान संघाचा कर्णधार असगर अफगानने (Asghar Afghan) भारताचा माजी कर्णधार महेद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडीत काढला आहे. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आता असगर अफगानच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. अफगानने टी-20 क्रिकेटमधील 52 सामन्यांपैकी 42 लढतीत विजय मिळवला आहे. तर, महेंद्र सिंह धोनीने त्याच्या टी-20 कारकिर्दीत 72 पैकी 41 सामन्यात विजय मिळवला आहे.

झिम्बॉव्बे विरुद्ध मालिका जिंकल्यानंतर असगर अफगानने धोनीचा विक्रम मागे टाकला आहे. धोनीला 72 लढतीपैकी 28 मध्ये पराभव स्विकारावा लागला होता. तर, अफगानला केवळ 9 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. विजयाच्या टक्केवारीचा विचार केल्यास अफगान अव्वल स्थानी आहे. त्याची विजयाची टक्केवारी 81.73 इतकी आहे. तर, धोनीची 59.28 इतकी आहे. हे देखील वाचा- England's ODI Squad Against India: भारत विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; जोफ्रा आर्चर संघाबाहेर

ट्वीट-

झिम्बॉव्वे विरुद्ध शेख जायद मैदानावर खेळण्यात आलेल्या अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाकडून नजीबुल्लाह जदरानने 35 चेंडूवर 72 धावांची तडाखेबाज खेळी केली. ज्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाला 20 षटकात सात विकेट्स गमावून 183 धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बॉब्वेच्या संघाला केवळ 136 पर्यंत मजल मारता आली.