लॉकडाउन काळात पत्नी अनुष्का शर्मासाठी डायनासोर बनला विराट कोहली, पाहा मजेदार व्हायरल Video

लॉकडाउनच्या या काळात अनुष्का पती विराटसोबत खूप मजेदार अंदाजात दिसत आहे. अनुष्काने पती विराटचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये कोहली डायनासोर सारखा घरात फिरताना दिसत आहे. अनुष्काने “मी पहिले.... एक डायनासोर फिरतोय.”

पत्नी अनुष्कासाठी विराट कोहली बनला डायनासोर (Photo Credit: Instagram)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सोशल मीडिया सक्रिय असतो आणि आता लॉकडाउनमुळे अधिक सक्रिय झाला आहे. विराट सध्या लॉकडाउनमुळे (Lockdown) मुंबईत पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) वेळ घालवत आहेत. दोघांनी या दरम्यान सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. दरम्यान, अनुष्काने पती विराटचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये कोहली डायनासोर सारखा घरात फिरताना दिसत आहे. अनुष्काने “मी पहिले.... एक डायनासोर फिरतोय.” तिने निर्मित केलेल्या 'पाताल लोक' ही वेब सीरिजला यूजर्सकडून आजकाल जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याने आजकाल अनुष्का खूप आनंदात आहे. अशा परिस्थितीत लॉकडाउनच्या या काळात अनुष्का पती विराटसोबत खूप मजेदार अंदाजात दिसत आहे. लॉकडाउनमुळे लग्नानंतर दोघांना पहिल्यांदा इतका वेळ सोबत घालवण्याची संधी मिळाली आहे.  (विराट कोहलीला त्याच्या बायोपिकमध्ये करायची आहे स्वतःची भूमिका, पत्नी अनुष्का शर्माच्या भूमिकेबद्दल केले 'हे' विधान)

अनुष्काने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराट आपल्या पत्नीसाठी 'डायनासोर' म्हणून काम करताना दिसत आहे. अनुष्काने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा मजेदार व्हिडिओ पाहून तुम्हीही नाकी लोटपोट व्हाल. पाहा:

 

View this post on Instagram

 

I spotted .... A Dinosaur on the loose 🦖🦖🦖🤪🤪🤪

A post shared by ɐɯɹɐɥS ɐʞɥsnu∀ (@anushkasharma) on

दरम्यान, यापूर्वी विराटने व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तो घरातच वर्कआऊट करताना दिसला. मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यापासून विराट-अनुष्का मुंबईच्या राहत्या घरात क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यांनी पंतप्रधानांच्या मदत निधीमध्ये योगदान दिले आणि कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी कोणते उपाययोजना करू शकतात याविषयी जनजागृती देखील केली आहे. अलीकडेच विराट भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्यासह लाईव्ह सत्रामध्ये दिसला, ज्यात अनुष्का विराटला लबाड म्हणतही ऐकू आली. छेत्रीबरोबर नुकत्याच झालेल्या इन्स्टाग्राम लाइव्ह सत्रामध्ये विराटने कबूल केले की, अनुष्काला भेटण्यापूर्वी तो आपण ‘स्वकेंद्रित’ होता आणि तिने त्याला कंपॅनिअनशिप महत्व जाणून देण्यास सहकार्य केले. 2017 मध्ये विराटबरोबर लग्न बंधनात अडकलेल्या अनुष्काने नुकतीच निर्माता म्हणून वेबवर पदार्पण केले. तिच्या अ‍ॅमेझॉन थ्रिलर 'पाताल लोक' वेबसिरीजला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now