IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी नव्या वेळापत्रकाची घोषणा, जाणून घ्या कोणत्या तारखेपासून सुरू होणार 

क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने सोमवारी नवीन वेळापत्रक जाहीर केले. या दौऱ्यात संघांमध्ये 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे.

(Photo Credit - Twitter, Instagram)

भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (South Africa Tour) जाणार असून, त्यासाठी नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन (Omicrone) या नवीन प्रकारामुळे हे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने सोमवारी नवीन वेळापत्रक जाहीर केले. या दौऱ्यात संघांमध्ये 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे. मालिकेतील पहिली कसोटी 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवली जाणार होती परंतु आता (CSA) वेळापत्रक बदलले आहे.

Tweet

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका आता 26 डिसेंबरपासून म्हणजेच बॉक्सिंग डे पासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या स्पोर्ट्स पार्कवर खेळवला जाणार आहे. दुसरी कसोटी पुढील वर्षी 3 जानेवारी (3 जानेवारी 2021) पासून खेळवली जाईल. त्याचबरोबर मालिकेतील शेवटचा कसोटी सामना केपटाऊनमध्ये होणार आहे. एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरू होईल, त्यानंतर दुसरा आणि तिसरा वनडे अनुक्रमे 21 आणि 23 जानेवारीला खेळवला जाईल. या दौऱ्यात पहिली टी-20 मालिकाही खेळवली जाणार होती, पण आता ती नंतर आयोजित केली जाणार आहे. (हे ही वाचा ICC Test Team Ranking: वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडला धूळ चारून टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत पुन्हा नंबर-1 सिंहासनावर विराजमान.)

कसोटी मालिका ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC-2022) नवीन भाग आहे, तर (ODI) मालिका ICC पुरुष विश्वचषक सुपर लीग, (ICC 2023) पात्रता स्पर्धेचा भाग बनेल. (CSA) ने म्हटले आहे की यजमान देशामध्ये ओमिक्रॉन प्रकारांच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने, लॉजिस्टिक प्लॅनिंगला अनुमती देण्यासाठी दौरा एका आठवड्याने उशीर होत आहे. दक्षिण आफ्रिकेने कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराच्या धोक्यात दौरा रद्द न करून भारताने दाखवलेल्या एकजुटीचे कौतुक केले आहे.

नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:-

 कसोटी मालिका

1. पहिली कसोटी 26-31 डिसेंबर, सेंच्युरियन

2. दुसरी कसोटी 03-07 जानेवारी, जोहान्सबर्ग

3. तिसरी कसोटी 11-15 जानेवारी, केप टाऊन

एकदिवसीय मालिका

1. पहिली वनडे 19 जानेवारी, पार्ल बोलंड पार्क

2. दुसरी वनडे 21 जानेवारी, पार्ल बोलंड पार्क

3. तिसरी वनडे 23 जानेवारी, केपटाऊन