Andre Russell New Record: आंद्रे रसेलने केवळ 3 विकेट घेत केला एक मोठा पराक्रम, लसिथ मलिंगाला टाकले मागे
आंद्रे रसेलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2.1 षटकात 3 बळी घेतले. यासह तो T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत 7व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आंद्रे रसेल (Andre Russell) स्फोटक फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजीत माहिर आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने 3 बळी घेत एक मोठा विक्रम केला. त्याने टी-20 क्रिकेटचा उस्ताद लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे. या सामन्यात रसेलने शानदार गोलंदाजी करत सर्वांची मने जिंकली. आंद्रे रसेलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2.1 षटकात 3 बळी घेतले. यासह तो T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत 7व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे. रसेलने आता T20 क्रिकेटमध्ये 440 सामन्यात 393 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर मलिंगाने टी-20 क्रिकेटमध्ये 390 विकेट घेतल्या आहेत. (हे देखील वाचा: KKR vs SRH, IPL 2023: हैदराबादने कोलकात्याचा केला 23 धावांनी पराभव, हॅरी ब्रूकचे शतक; नितीश राणा-रिंकू सिंगचे अर्धशतक व्यर्थ)
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज:
ड्वेन ब्राव्हो - 615 विकेट्स
राशिद खान - 536 विकेट्स
सुनील नरेन - 484 विकेट्स
इम्रान ताहिर - 469 विकेट्स
शाकिब अल हसन - 451 विकेट्स
वहाब रियाझ - 413 विकेट्स
आंद्रे रसेल - 393 विकेट्स
लसिथ मलिंगा - 390 विकेट्स
सोहेल तन्वीर - 389 विकेट्स
अनेक सामने स्वबळावर जिंकले
आंद्रे रसेल जगातील अनेक टी-20 लीगमध्ये खेळतो. तो 2012 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आयपीएलच्या 101 सामन्यांमध्ये 2071 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 91 विकेट घेतल्या आहेत. रसेलची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 88 धावा आहे. त्याच वेळी, त्याचा स्ट्राइक रेट 177.62 आहे. कोणत्याही गोलंदाजीचा मुकाबला करण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याने KKR चे अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.