KKR vs SRH, IPL 2023: हैदराबादने कोलकात्याचा केला 23 धावांनी पराभव, हॅरी ब्रूकचे शतक; नितीश राणा-रिंकू सिंगचे अर्धशतक व्यर्थ

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा 23 धावांनी पराभव केला. सनरायझर्स हैदराबादचा हा दुसरा विजय आहे.

KKR vs SRH, IPL 2023: हैदराबादने कोलकात्याचा केला 23 धावांनी पराभव, हॅरी ब्रूकचे शतक; नितीश राणा-रिंकू सिंगचे अर्धशतक व्यर्थ

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील 19 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा 23 धावांनी पराभव केला. सनरायझर्स हैदराबादचा हा दुसरा विजय आहे. तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 228 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादसाठी सलामीवीर हॅरी ब्रूकने झटपट खेळी करताना शानदार नाबाद धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 205 धावा करू शकला. कोलकाता नाईट रायडर्सकडून कर्णधार नितीश राणाने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. सनरायझर्स हैदराबादकडून मयंक मार्कंडे आणि मार्को जॅनसेन यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2023 11:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).