ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हेली ने कर्णधार मेग लॅनिंग चा रेकॉर्ड मोडत श्रीलंकाविरुद्ध टी-20 मध्ये केला 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड

हिलीने श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामन्यात 61 चेंडूत 148 धावा केल्या आणि या टी -20 क्रिकेटमधील कोणत्याही महिला क्रिकेटपटूची सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगकडे होता.

एलिसा हेली (Photo Credit: Getty)

टी -20 क्रिकेट आल्यानंतर क्रिकेट खेळायची पद्धत बदलली आहे. आता फलंदाजांनी अधिक आक्रमक खेळ सुरू केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) महिला संघाची यष्टिरक्षक-फलंदाज एलिसा हिली (Alyssa Healy) ने टी-20 मध्ये श्रीलंका महिला संघाविरुद्ध मॅचमध्ये एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे. महिला क्रिकेटच्या आक्रमक फलंदाजांपैकी एक असलेल्या अलिसा हिलीने श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामन्यात 61 चेंडूत 148 धावा करत टी-20 मध्ये नवीन विक्रम रचला. श्रीलंकाविरुद्ध टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 2 गडी गमावून 226 धावा केल्या. यात हिलीने 148 धावांचे योगदान दिले. श्रीलंकाविरुद्ध हिलीची शतकी खेळीही टी -20 क्रिकेटमधील कोणत्याही महिला क्रिकेटपटूची सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग (Meg Lanning) कडे होता.

लॅनिंगने इंग्लंडविरुद्ध नाबाद 133 धावा केल्या होत्या. हिलीने या सामन्यात 242.6 च्या सरासरीने धावा केल्या. दुसरीकडे, विकेटकीपर-फलंदाज म्हणून हिलीने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आज सर्वोत्तम धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलम (Brandon McCullum) याने केला होता. मॅक्युलमने 2012 मध्ये बांगलादेशविरुद्ध 123 धावा केल्या होत्या. या विक्रमाशिवाय हिली ही आतापर्यंतची पहिली विकेटकीपर खेळाडू ठरली जिने संघात विकेटकीपर म्हणून खेळताना टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकले आहे. यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी खेळली, पण त्यांना या टप्प्यावर पोहोचता आले नाही. म्हणूनच एलिसा हिलीचा हा खूप मोठा विक्रम आहे.

दरम्यान, या मॅचमध्ये श्रीलंका महिला संघाला विजय मिळवणे कठीण दिसत आहे. यापूर्वी पहिल्या दोन्ही मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने सहजतेने विजय मिळवला. यापूर्वी खेळलेल्या सामन्यात हिलीने शानदार फलंदाजी केली होती.