IPL Auction 2025 Live

T20 WC 2024 Super 8 Scenario: अफगाणिस्तानसह हे संघ सुपर-8 साठी पात्र, न्यूझीलंड-श्रीलंकेसह सहा संंघांना मिळाले घरचे तिकीट

तसेच, पुढील कोणते संघ पात्र ठरणार आहे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि कोणत्या संघांना आतापर्यंत घरचे तिकीट मिळाले आहे ते ही आम्ही तुम्हाला सांगू...

AFG Team (Photo Credit - X)

T20 World Cup 2024: झटपट टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या महाकुंभमध्ये आतापर्यंत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होत आहेत. मात्र, पुढील फेरीत केवळ आठ संघ प्रवेश करणार आहे. आतापर्यंत अफगाणिस्तान आणि भारतासह चार संघ सुपर-8 साठी पात्र ठरले आहेत. तसेच, पुढील कोणते संघ पात्र ठरणार आहे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि कोणत्या संघांना आतापर्यंत घरचे तिकीट मिळाले आहे ते ही आम्ही तुम्हाला सांगू... (हे देखील वाचा: Team India चे सराव सत्र रद्द, सामन्यावर धोक्याची घंटा; जाणून घ्या काय आहे कारण)

भारतीय संघ अ गटातून सुपर-8 साठी पात्र

2024 च्या T20 विश्वचषकात 20 संघांना चार गटात विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातून फक्त दोनच संघ स्पर्धेच्या पुढील टप्प्यात प्रवेश करतील. भारतीय संघाने 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेत अ गटातून सुपर-8 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. अमेरिका किंवा पाकिस्तान या गटातून दुसरा संघ असू शकतो. अमेरिकेला सुपर-8 मध्ये पोहोचण्यासाठी फक्त आपला सामना जिंकावा लागेल, तर दुसरीकडे, पाकिस्तानलाही पात्र होण्यासाठी आपला सामना जिंकावा लागेल आणि आयर्लंडविरुद्ध अमेरिकेच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. मात्र, या गटातून अद्याप एकही संघ बाहेर पडलेला नाही.

ऑस्ट्रेलिया ब गटातून सुपर-8 साठी पात्र

ऑस्ट्रेलियाने ब गटातून पुढील फेरीत म्हणजेच सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आपले सर्व सामने जिंकले आहेत. या गटातील दुसरा संघ स्कॉटलंड किंवा इंग्लंड असू शकतो. येथे देखील प्रकरण मागील गटाप्रमाणेच आहे. इंग्लंडला त्यांचा शेवटचा साखळी सामना जिंकावा लागेल आणि स्कॉटलंडच्या पराभवासाठीही प्रार्थना करावी लागेल, तर स्कॉटलंडने शेवटचा सामना जिंकल्यास तो सुपर-8 साठी पात्र ठरेल. नामिबिया आणि ओमान या गटातून बाहेर पडले आहेत.

क गटातून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज पात्र, न्यूझीलंड बाहेर

क गट पूर्ण झाला आहे. या गटातून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज सुपर-8 साठी पात्र ठरले आहेत. तर युगांडा, पापुआ न्यू गिनी आणि न्यूझीलंड बाहेर गेले आहेत. न्यूझीलंड प्रथमच टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतून बाहेर पडला आहे.

ड गटातून श्रीलंका बाहेर, बांगलादेशच्या आशा जिवंत

दक्षिण आफ्रिकेचा संघ ड गटातून सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. तर बांगलादेश हा या गटातून पुढील फेरीत जाणारा दुसरा संघ ठरू शकतो. तथापि, नेदरलँड्स देखील अद्याप शर्यतीत आहे, परंतु त्याचा नेट रन रेट खूपच खराब आहे. बांगलादेशला शेवटचा साखळी सामना नेपाळविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना जिंकताच ते सुपर-8 साठी पात्र ठरतील