अ‍ॅलेक्स हेल्स ने कोरोना व्हायरसच्या संसर्गासंबंधीचे हेल्थ अपडेट केले जाहीर, खोटी बातमी पसरवणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला दिले चोख प्रत्युत्तर

जमल जामी नावाच्या पाकिस्तानी पत्रकाराने कोरोना चाचणीत हेल्स पॉझिटीव्ह सापडला असल्याचे सांगितले. यावर हेल्स भडकला आणि त्याने या ट्विटला प्रतिसाद देत लिहिले, "अफवा पसरवणे थांबवा. कोरोनाच्या भीतीमुळे त्याने आणि बर्‍याच परदेशी खेळाडूंसहस्पर्धा मध्यभागी सोडली आपल्या देशात परतला.

अ‍ॅलेक्स हेल्स (Photo Credit: Getty Images)

पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) पाचव्या सत्रात 17 मार्च दोन सेमीफायनल सामने खेळले जाणार होते आणि अंतिम सामना 18 मार्च रोजी खेळला जाणार होता, परंतु सेमीफायनल सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यादरम्यान पीसीबीकडून हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि सध्याचे प्रसिद्ध भाष्यकार रमीझ राजा (Rameez Raja) यांनी एका निवेदनात म्हटले आहे की पीएसएलमध्ये कराची किंग्जकडून खेळणार्‍या इंग्लंडचा फलंदाज अ‍ॅलेक्स हेल्समध्ये (Alex Hales) कोरोना व्हायरसच्या संसर्गाची चिन्हे होती ज्यामुळे पीएसएलचे सामाने स्थगित करण्यात आले. आता हेल्सने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीविषयी एक विधान शेअर केले आहे. हेल्सचीही या आजाराची तपासणी होणार असल्याचे राजाने पुष्टी केली होती. (PSL 2020: कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तान सुपर लीगलाही लागला ब्रेक, बाद फेरी शिल्लक असताना पीएसएल टी-20 लीग स्थगित)

ही बातमी व्हायरल होताना पाहताच राजाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हे स्पष्ट केले की अद्याप हेल्सची वैद्यकीय तपासणी झालेली नाही. हेल्स स्वत: आयसोलेशनमध्ये राहत आहे. रमीझने लोकांना अफवा पसरवणे थांबवावे अशी विनंती केली. दरम्यान, अजमल जामी नावाच्या पाकिस्तानी पत्रकाराने कोरोना चाचणीत हेल्स पॉझिटीव्ह सापडला असल्याचे सांगितले. यावर हेल्स भडकला आणि त्याने या ट्विटला प्रतिसाद देत लिहिले, "अफवा पसरवणे थांबवा, ही एक धोकादायक कृती आहे." यासह त्याने एक निवेदनही प्रसिद्ध केले.

माझ्या परिस्थितीबद्दल अपडेट

हेल्स पीएसएल 2020 मध्ये कराची किंग्जकडून खेळत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे त्याने आणि बर्‍याच परदेशी खेळाडूंसहस्पर्धा मध्यभागी सोडली आपल्या देशात परतला. मात्र, उपांत्य फेरीपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही लीग रद्द केली होती. दरम्यान, या लीगशी संबंधित सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी केली जाईल, हेल्स देखील त्याच प्रक्रियेतून जाईल,  कारण त्याच्यामध्ये या आजाराची काही लक्षणे आढळली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now