ब्रायन लारासारखी फलंदाजी करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंच्या लिस्टमध्ये एलिस्टर कुकने रिकी पॉन्टिंग, जॅक कालीस समवेत विराट कोहलीला दिले स्थान
कोहली व्यतिरिक्त कुकने ज्या फलंदाजांना लाराचा जवळचा मानले त्यामध्ये रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस आणि कुमार संगकारा यांचा समावेश केला.
इंग्लंड टेस्ट संघाचा माजी कर्णधार एलिस्टर कुक (Alastair Cook) याने भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे आणि त्याची तुलना वेस्ट इंडीजचा माजी फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) याच्याशी केली. 2018 मध्ये निवृत्त होण्यापूर्वी असंख्य कसोटी विक्रम मोडणाऱ्या कुकने सांगितले की मेरीलेबोन क्रिकेट क्लबसमवेत (MCC) वेस्ट इंडिज दौर्यादरम्यान लाराच्या वर्चस्वामुळे तो अस्वस्थ झाला होता. लारा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटच्या डावात 400 धावा केल्या आहेत. त्याने 131 कसोटी सामन्यात 11,953 धावा तर 299 एकदिवसीय सामन्यात 10505 धावा केल्या आहेत. संडे टाइम्सशी बोलताना कुकने 2004 च्या दौर्याची आठवण सांगितली जेव्हा लाराने शतकी खेळी केली आणि कूकच्या टीमला अडचणीत टाकले. "2004 च्या दौर्याच्या पहिल्या सामन्यात मी अरुंदेल येथे वेस्ट इंडिज खेळणार्या एमसीसी संघाचा सदस्य होतो. आमच्या संघात चांगले वेगवान गोलंदाज होते. सिमन जोन्स, मॅथ्यू होगार्ड, मीन पटेल … हे वेगवान गोलंदाज आमच्या संघात होते. लाराने दुपारच्या आणि चहाच्या दरम्यान शतकी खेळी केली ज्यामुळे मला जाणवले की मी मी एक वेगळ्याच स्तरावरील अत्युत्तम फलंदाजी पाहत आहे." (डेविड वॉर्नर याने सांगितला विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ मधील फरक; भारतीय कर्णधाराशी तुलना करत केले 'हे' मोठे विधान)
कूकने लाराच्या अलौकिक फलंदाजीशी जवळीक साधणार्या चार क्रिकेटपटूंची नावं शेअर केली. यात त्याने कोहली व्यतिरिक्त कुकने ज्या फलंदाजांना लाराचा जवळचा मानले त्यामध्ये रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस आणि कुमार संगकारा यांचा समावेश केला. इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणाला की, आधुनिक युगातील खेळाडू निवडल्यास विराट कोहली या यादीत असेल. कुक म्हणाला, "जेव्हा मी इंग्लंडकडून खेळत होतो तेव्हा त्याच्या जवळ आले ते पॉन्टिंग, कॅलिस आणि संगकारकर होते. "आता तुम्हाला त्या गटात विराट कोहलीचा समावेश करावा लागेल, विशेषत: तिन्ही फॉर्मेटमध्ये इतक्या मुक्तपणे धावा करण्याच्या क्षमतेसाठी."
कोहलीच्या खेळातील तिन्ही फॉर्मेटमध्ये सरासरी 50 च्या वर आहे. त्याने यापूर्वी 248 वनडे सामन्यांमध्ये 43 शतकांसह 11867 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 86 सामन्यात 27 शतकांसह 7240 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, कुकने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 161 टेस्ट सामन्यात 12,472 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा कसोटी फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्या कुकने सचिन तेंडुलकर, लारा, पॉन्टिंग, राहुल द्रविड, संगकारा आणि कॅलिस यांच्यासह खेळला आहे.