IND vs PAK World Cup 2023 Live Streaming: भारत - पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज, घरबसल्या येथे पाहा लाइव्ह

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक अहमदाबादला पोहोचणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) 1.30 लाख प्रेक्षक एकाच वेळी सामना पाहू शकतात. हा सामना दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल.

IND vs PAK (Photo Credit - Twitter)

एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ अहमदाबादला (Ahmedabad) पोहोचले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक अहमदाबादला पोहोचणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) 1.30 लाख प्रेक्षक एकाच वेळी सामना पाहू शकतात. हा सामना दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल. भारतीय संघाला आपला वेग कायम राखायचा आहे, तर बाबर आझमच्या संघालाही भारताविरुद्ध विजयाची आशा असेल. (हे देखील वाचा: Shubman Gill Health Update: भारत-पाक सामन्यासाठी शुभमन गिल 99 टक्के फिट, कर्णधार रोहितचा पत्रकार परिषदेत मोठा खुलासा)

कधी आणि कुठे पाहणार सामना?

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. तुम्ही या सामन्याचे Disney + Hotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

हेड टू हेड रेकॉर्ड

टीम इंडियाचा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचा विक्रम खूपच चांगला राहिला आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या विजयाची पाकिस्तान अजूनही वाट पाहत आहे. एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडिया आणि पाकिस्तान 7 वेळा आमनेसामने आले आहेत, मात्र टीम इंडियाने सातही वेळा जिंकून आपला उत्कृष्ट रेकॉर्ड कायम ठेवला आहे.

जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच चांगली मानली जाते. येथे फलंदाज वेगाने धावा काढू शकतात, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना उच्च धावसंख्येचा खेळ पाहायला मिळतो. पण नवीन चेंडूमुळे वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू मधल्या षटकांमध्ये खेळात नक्कीच असतील. येथे आतापर्यंत एकूण 29 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 237 धावांची आहे. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 16 सामने जिंकले आहेत.

कसे असेल हवामान?

वेदरकॉमने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, शनिवारी अहमदाबादमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही आणि आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

एकदिवसीय विश्वचषकासाठी दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, शार्दुल ठाकुर.

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सौद शकील, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर.

Share Now

Tags

Abdullah Shafiq Ahmedabad Babar Azam Fakhar Zaman Hardik Pandya Haris Rauf Hasan Ali ICC Cricket World Cup 2023 Iftikhar Ahmed Imam ul Haq IND vs PAK World Cup 2023 Live Streaming India India vs Pakistan Ishan Kishan Jasprit Bumrah KL Rahul Kuldeep Yadav Mohammad Nawaz Mohammad Rizwan Mohammad Shami Mohammad Siraj Mohammad Wasim Jr Narendra Modi Stadium Pakistan Ravichandran Ashwin Ravindra Jadeja Rohit Sharma Salman Agha Saud Shakeel Shadab Khan Shaheen Afridi SHARDUL THAKUR Shreyas Iyer Shubman Gill SURYAKUMAR YADAV Usama Mir Virat Kohli अब्दुल्ला शफीक अहमदाबाद आयसीसी क्रिकेट विश्वचषक इफ्तिखार अहमद इमाम उल हक इशान किशन उसामा मीर कुलदीप यादव केएल राहुल जसप्रीत बुमराह नरेंद्र मोदी स्टेडियम पाकिस्तान फखर जमान बारबाल आझम भारत भारत विरुद्ध पाकिस्तान मोहम्मद नवाज मोहम्मद रिझवान मोहम्मद वसीम जूनियर मोहम्मद शमी मोहम्मद सिराज रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा रोहित शर्मा विराट कोहली शादाब खान शार्दुल ठाकूर शाहीन आफ्रिदी शुबमन गिल श्रेयस अय्यर सलमान आगा सूर्यकुमार यादव सौद शकील हसन अली हारिस रौफ हार्दिक पंड्या
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement