युवराज सिंह याच्या निवृत्तीनंतर चाहत्यांच्या सोशल मीडियावर भावूक प्रतिक्रीया
सिक्सर किंगच्या निवृत्तीनंतर चाहत्यांच्या सोशल मीडियावर भावूक प्रतिक्रीया.
युवराज सिंह (Yuvraj Singh) याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेत युवराज सिंहने आपली निवृत्ती घोषित केली. यंदा आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्यात युवराज खेळला. युवराजने निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर एकीकडे त्याचे चाहते अत्यंत भावूक झाले आहेत. (सिक्सर किंग 'युवराज सिंह' याचा क्रिकेट विश्वाला रामराम, जड अंतःकरणाने केली निवृत्तीची घोषणा)
चाहत्यांच्या प्रतिक्रीया:
युवराज सिंह याने भारतासाठी 40 कसोटी सामने, 304 एकदिवसीय सामने आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. संपूर्ण करिअरमध्ये युवराजने कसोटी सामन्यात 1900 धावा तर एकदिवसीय सामन्यात 8701 धावा केल्या आहेत. टी-20 इंटरनॅशनल मध्ये युवराज सिंहच्या नावावर 1177 धावांची नोंद आहे. मात्र अचानक युवराजला कॅन्सरने ग्रासले. ती लढाईही तो जिंकला मात्र त्यानंतर त्याचा फॉर्म काही खास राहिला नाही.