IND vs SA 2nd ODI: विराट कोहलीनंतर आता श्रेयस अय्यरने केला हा पराक्रम, रांचीमध्ये शतक झळकावून स्पेशल क्लबमध्ये मिळवली जागा
या विजयासह टीम इंडियाने (Team India) तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी दिल्लीत होणार आहे.
श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) शतक आणि तिसर्या विकेटसाठी इशान किशनने (Ishan Kishan) केले (93) धावा या दोघांच्या 161 धावांची भागीदारी यामुळे भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) सात गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने (Team India) तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी दिल्लीत होणार आहे. मोहम्मद सिराजने (10 षटकात 38 धावांत 3 बळी) गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 7 बाद 278 धावांत रोखल्यानंतर 25 चेंडू बाकी असताना 3 बाद 282 धावा करून भारताने सामना जिंकला. रविवारी जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रेयस अय्यरने विराट कोहलीसह एका खास क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
श्रेयसने 111 चेंडूंच्या नाबाद खेळीत 15 चौकार मारले, तर किशनने घरच्या मैदानावर 84 चेंडूंच्या आक्रमक खेळीत चार चौकार आणि सात षटकार ठोकले. किशन बाद झाल्यानंतर श्रेयसने मागील सामन्यात संजू सॅमसन (नाबाद 30) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची अखंड भागीदारी केली. (हे देखील वाचा: Women's Asia Cup 2022: भारत-पाकिस्तान उपांत्य फेरीत दाखल, जाणून घ्या सामना कधी होणार)
अय्यरने रविवारी 111 चेंडूत 113 धावांच्या नाबाद खेळीत 15 चौकार मारले, ज्यामुळे तो कोहलीच्या खास क्लबमध्ये दाखल झाला. रांचीमध्ये वनडेमध्ये शतक झळकावणारा अय्यर हा कोहलीनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. कोहलीने 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 123 आणि 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 139 धावा केल्या होत्या. विराट कोहलीशिवाय या मैदानावर श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज आणि उस्मान ख्वाजा यांनीही शतके झळकावली आहेत. येथे शतक झळकावणारा अय्यर हा चौथा खेळाडू ठरला आहे.