SRH vs PBKS, TATA IPL 2025 27th Match 1st Inning Scorecard: प्रियांश-प्रभसिमरनच्या वादळानंतर श्रेयस अय्यरची बॅट गर्जली, पंजाबने हैदराबादसमोर ठेवले 246 धावांचे लक्ष्य

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत पंजाबने हैदराबादसमोर ठेवले 246 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

SRH vs PBKS, TATA IPL 2025 27th Match 1st Inning Scorecard: प्रियांश-प्रभसिमरनच्या वादळानंतर श्रेयस अय्यरची बॅट गर्जली, पंजाबने हैदराबादसमोर ठेवले 246 धावांचे लक्ष्य
SRH vs PBKS (Photo Credit - X)

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 27 वा सामना 12 एप्रिल (शनिवार) रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली, सनरायझर्स हैदराबादने सलग चार सामने गमावले आहेत आणि आता संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघाने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत आणि फक्त एक सामना गमावून पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत पंजाबने हैदराबादसमोर ठेवले 246 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

श्रेयस अय्यरची बॅट गर्जली

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जच्या संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गडी गमावून 245 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 82 धावांची शानदार खेळी केली. या शानदार खेळीदरम्यान, श्रेयस अय्यरने फक्त 36 चेंडूत सहा षटकार आणि सहा चौकार लगावले. श्रेयस अय्यर व्यतिरिक्त, सलामीवीर प्रभसिमरन सिंगने 42 धावा केल्या.

हर्षल पटेलने घेतल्या सर्वाधिक 4 विकेट्स

दुसरीकडे, स्टार गोलंदाज हर्षल पटेलने सनरायझर्स हैदराबाद संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. सनरायझर्स हैदराबादकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हर्षल पटेल व्यतिरिक्त इशान मलिंगाने दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकांत 246 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून त्यांच्या खात्यात दोन गुण जोडायचे आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Apr 12, 2025 09:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).