BCCI President: सौरव गांगुलीच्या बीसीसीआयमधून बाहेर पडल्यानंतर वाढला राजकीय गोंधळ, टीएमसीचे भाजपवर गंभीर आरोप

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने गांगुली अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याच्या वृत्तानंतर भारतीय जनता पक्षावर (BJP)निशाणा साधला आहे.

Sourav Ganguly and Jay Shah (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नावावरून राजकारण सुरू झाले आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने गांगुली अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याच्या वृत्तानंतर भारतीय जनता पक्षावर (BJP)निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेसचे (TMC) म्हणणे आहे की, भाजपने गांगुली यांना पक्षात सामावून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. माजी क्रिकेटपटू राजकीय सूडबुद्धीचा बळी ठरल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. टीएमसी नेते डॉ शंतनू सेन म्हणाले, अमित शाह काही महिन्यांपूर्वी सौरव गांगुलीच्या घरी गेले होते. गांगुली यांना भाजपमध्ये येण्यासाठी वारंवार संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे. कदाचित ते भाजपमध्ये जाण्यास राजी नसेल आणि ते बंगालचे आहे म्हणून ते राजकीय सूडबुद्धीला बळी पडला. विशेष बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही वेळापूर्वी माजी क्रिकेटपटूच्या घरी डिनरसाठी पोहोचले होते.

यापूर्वी देखील, पक्षाने भाजपवर माजी क्रिकेटचा "अपमान करण्याचा प्रयत्न" केल्याचा आरोप केला होता. टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, 'आम्ही या प्रकरणी थेट काहीही बोलत नाही. निवडणुकीनंतर भाजपकडून असा प्रचार सुरू असल्याने अशा अटकळांना उत्तर देण्याची जबाबदारी भाजपची आहे. भाजप सौरवचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

काय आहे प्रकरण 

माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी गांगुलीची जागा घेऊ शकतात, अशा बातम्या येत होत्या. बिन्नी 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होते. त्यांनी मंगळवारीच या पदासाठी अर्ज दाखल केला आहे. 18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मंडळाच्या वार्षिक सभेत त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टीएमसीनचा भाजपवर हल्लाबोल

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गांगुलीचे नाव वगळण्यात आल्याचे वृत्त समोर येताच टीएमसीने भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. सेन यांनी ट्विट केले, 'राजकीय सूडाचे आणखी एक उदाहरण. अमित शहा यांचा मुलगा सचिवपदी कायम राहिला, पण सौरव गांगुली नाही. ते ममता बॅनर्जी यांच्या राज्यातील आहेत की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही म्हणून? दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत. (हे देखील वाचा: Roger Binny, माजी भारतीय क्रिकेटपटू नवे BCCI President होण्याची शक्यता; Jay Shah सेक्रेटरी तर BJP MLA Ashish Shelar खजिनदार होण्याची शक्यता)

भाजपने आरोप टाळले

तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे  भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटलंय. "सौरव गांगुलीचा भाजपमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न कधी झाला? हे आम्हाला माहीत नाही. सौरव गांगुली हा क्रिकेट जगतातील एक दिग्गज आहे. पण काही लोक बीसीसीआयमध्ये होत असलेल्या बदलांवर मगरीचे अश्रू ढाळत आहेत." सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष होण्याआधी कधी कोणतं पद भूषवलं होतं का? असाही सवाल दिलीप घोष यांच्याकडून उपस्थित करण्यात केला. टीएमसीनं प्रत्येक मुद्द्यावर राजकारण करणे टाळावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now