IND vs BNG ODI & Test Series 2022 Schedule: न्यूझीलंडसोबत वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचा बांग्लादेश दौरा, जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक

या दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेने होईल जिथे पहिला एकदिवसीय सामना मीरपूरच्या शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

IND vs BNG ODI & Test Series 2022 Schedule: न्यूझीलंडसोबत वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचा बांग्लादेश दौरा, जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक
IND vs BAN, Photo Credit - Twitter

India Tour of Bangladesh 2022: भारतीय संघ न्यूझीलंडसोबत वनडे मालिका गमावल्यानंतर लगचेच बांगलादेशचा दौरा करणार आहे. जिथे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI Series) आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) खेळेल. या दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेने होईल जिथे पहिला एकदिवसीय सामना मीरपूरच्या शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. चला तर मग आम्ही तुम्हाला या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक...

जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक

1. एकदिवसीय मालिका

  • पहिला एकदिवसीय: 4 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता, शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाक
  • दुसरी एकदिवसीय: 7 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता, शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
  • तिसरा एकदिवसीय: 10 डिसेंबर दुपारी 12.30 वाजता, जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चटगाव

2. कसोटी मालिका

  • पहिली कसोटी मालिका: 14 – 18 डिसेंबर सकाळी 9.30 वाजता, जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चटगाव
  • दुसरी कसोटी मालिका:  22 – 26 डिसेंबर सकाळी 9.30 वाजता, शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, केएल राहुल, ऋषभ पंत, दीपक चहर, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, यश दयाल.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत, श्रीकर भरत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2022 04:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).