Team India Upcoming Schedule 2022: टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ आता या दोन देशांचा करणार दौरा, जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक

दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून न्यूझीलंडला (New Zealand) जाणार आहेत. तर या पैकी काही वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

भारतीय संघाचे T20 विश्वचषक (T20 WC 2022) जिंकण्याचे स्वप्न यंदाही अपूर्ण राहिले आहे. सुपर-12 पर्यंत टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट होती, मात्र उपांत्य फेरीत इंग्लंडचा 10 विकेट्सनी पराभव करून भारताचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. T20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाला आता दोन देशांचा दौरा करायचा आहे, ज्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून न्यूझीलंडला (New Zealand) जाणार आहेत. तर या पैकी काही वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. हार्दिक पांड्याकडे न्युझीलंड टी-20 सामन्याचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. इतकंच नाही तर टीम इंडियाचे प्रक्षिशक राहुल द्रविड आणि संपूर्ण कोचिंग स्टाफही बदलला जाणार आहे, कारण त्यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण अँड कंपनी न्यूझीलंडला जाणार आहे.

न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

पहिला T20 - 18 नोव्हेंबर, दुपारी 12 वाजल्यापासून

दुसरा T20 - 20 नोव्हेंबर, दुपारी 12 वाजल्यापासून

तिसरा T20 - 22 नोव्हेंबर दुपारी 12 वाजल्यापासुन

वनडे सामन्याचे वेळापत्रक

पहिली वनडे - 25 नोव्हेंबर, सकाळी 7 वाजता

दुसरी वनडे - 27 नोव्हेंबर, सकाळी 7 वाजता

तिसरी वनडे - 30 नोव्हेंबर, सकाळी 7 वाजता

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

भारतीय टी-20 संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह हर्षल पटेल, मो. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

भारतीय वनडे संघ: शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

भारताचा बांगलादेश दौरा

न्यूझीलंड दौऱ्यावर हे 6 सामने खेळल्यानंतर भारतीय संघाला बांगलादेशचा दौरा करायचा आहे. या दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबर रोजी ढाका येथे होणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्याने होणार आहे. टीम इंडिया या बांगलादेश दौऱ्यावर तीन वनडेसह दोन कसोटी सामने खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह वरिष्ठ खेळाडू बांगलादेश दौऱ्यावर परतणार आहेत. (हे देखील वाचा: ICC Prize Money for T20 WC 2022: टी-20 विश्वचषकातून बाहेर पडूनही भारतीय संघाला मिळणार कोट्यवधींचं बक्षीस, पाहा आयसीसीची बक्षीस रकमेची यादी)

पहिली वनडे - 4 डिसेंबर, दुपारी 12.30 वा

दुसरी वनडे - 7 डिसेंबर, दुपारी 12:30 वा

तिसरी वनडे - 10 डिसेंबर, दुपारी 12.30 वा

कसोटी सामन्याचे वेळापत्रक

पहिली कसोटी- 14 ते 18 डिसेंबर, सकाळी 9.30 वा

दुसरी कसोटी- 22 ते 26 डिसेंबर, सकाळी 9.30 वा

बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघ

भारतीय वनडे संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, यश दयाल

भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), केएस भरत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif