अशी होती संपूर्ण सामन्याची परिस्थिती
चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 515 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला. रविचंद्रन अश्विनने कहर केला आणि सहा विकेट घेतल्या. कसोटीतील त्याची पाच विकेट घेण्याची 37वी ठरली आणि त्याने या बाबतीत महान शेन वॉर्नची बरोबरी केली. बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक 82 धावा केल्या.
हे देखील वाचा: ICC World Test Championship च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आता किती सामने जिंकावे लागतील? एका क्लिकवर समजून घ्या समीकरण
बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर संपला
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर संपला. भारतीय संघाने दुसऱ्या डावात बांगलादेशला फॉलोऑन होऊ न देता 227 धावांची आघाडी घेऊन फलंदाजी केली. भारताने आपला दुसरा डाव 4 गडी बाद 287 धावांवर घोषित केला आणि एकूण 514 धावांची आघाडी घेतली.
बांगलादेशला 234 धावांवर ऑल आऊट केले
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 234/10 धावांवर ऑल आऊट केले. यादरम्यान रविचंद्रन अश्विनने 6 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 280 धावांनी जिंकला.