IPL Auction 2025 Live

AFG T20 WC 2024 Semi-final Qualification Scenarios: ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केल्यानंतर अफगाणिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा जिवंत; काय आहे समीकरण घ्या जाणून

संघाचे गोलंदाज आणि फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. एक संघ दोन प्रकारे उपांत्य फेरी गाठू शकतो.

AFG Team (Photo Credit - X)

AFG Beat AUS Super 8: अफगाणिस्तान संघाने दमदार शैलीत ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव (AFG Beat AUS) करत उपांत्य फेरीच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अफगाण संघाने टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) अप्रतिम कामगिरी केली. या संघाने ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडसारख्या संघाला पराभूत करून सुपर-8 मध्ये स्थान पक्के केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर अफगाणिस्तानचे दोन गुण झाले असून त्यांचे मनोबल उंचावले आहे. संघाचे गोलंदाज आणि फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. एक संघ दोन प्रकारे उपांत्य फेरी गाठू शकतो. (हे देखील वाचा: Afghanistan Players Dance Video: ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा ड्वेन ब्राव्होसोबत 'चॅम्पियन' गाण्यावर डान्स, पाहा व्हिडिओ)

ऑस्ट्रेलियन संघाचा नेट रन रेट जास्त आहे

अफगाणिस्तानने सुपर-8 फेरीत आतापर्यंत एकूण दोन सामने खेळले आहेत, त्यापैकी एकात संघाला भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला आहे. संघाचा नेट रन रेट - 0.650 आहे. पराभवानंतरही ऑस्ट्रेलियन संघाचा नेट रन रेट जास्त आहे. त्याचा नेट रन रेट प्लस + 0.223 आहे. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे 2-2 गुण आहेत.

अफगाणिस्तानचा संघ या 2 मार्गांनी उपांत्य फेरी गाठू शकतो

1. पहिले समीकरण

अफगाणिस्तान संघाला 25 जून रोजी बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. संघाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. म्हणजे त्यांचे चार गुण होतात. तसंच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करावं अशी प्रार्थना करावी लागेल. यासह ऑस्ट्रेलियाचे दोन गुण शिल्लक राहतील आणि अफगाण संघ 4 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचेल.

2. दुसरे समीकरण

ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, जर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करू शकला नाही आणि सामना एका धावेने हरला, तर अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांचे प्रत्येकी चार समान गुण होतील. मग चर्चा होईल नेट रन रेटवर. त्यानंतर उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना 36 प्लस धावांनी जिंकावा लागेल. जेणेकरून त्याचा नेट रन रेट ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला होईल.

दुसरीकडे, जर ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग केला आणि शेवटच्या चेंडूवर विजयाची नोंद केली, तर अफगाण संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी बांगलादेशविरुद्धचा सामना 15.4 षटकांत किंवा त्याआधी जिंकावा लागेल. (पहिल्या डावाची धावसंख्या 160 आहे असे गृहीत धरून)