Akriti Agarwal-Prithvi Shaw Separation: 'आमचे मार्ग वेगळे...' अक्रिती अगरवाल - पृथ्वी शॉ चा साखरपुड्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच ब्रेकअप!

अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अक्रिती अगरवाल हिने आपला साखरपुडा मोडल्याची अधिकृत माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. वेगवेगळी ध्येये आणि सद्यस्थिती यामुळे आपण वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

AKRITI AGARWAL

अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अक्रिती अगरवाल (Akriti Agarwal) हिने आपला साखरपुडा मोडल्याची अधिकृत घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यासोबतचे नाते संपुष्टात आल्याची माहिती तिने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. साखरपुड्याच्या सहा महिन्यांतच त्यांनी एकमेकांपासून वेगळे होत असल्याचं जाहीर केले आहे.

काय म्हटले पोस्टमध्ये?

 

View this post on Instagram

 

A post shared by AKRITI AGARWAL (@akritiagarwal7)

अक्रितीने काळ्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या पोस्टमध्ये, आपण आणि आपला होणारा पती वेगवेगळी ध्येये आणि सद्यस्थितीमुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. एकमेकांवर प्रेम आणि आदर असूनही दोघांचे मार्ग एकत्र चालण्यासाठी नाहीत, हे स्वीकारल्याचेही तिने नमूद केले. सध्याच्या जबाबदाऱ्या आणि परिस्थिती लक्षात घेता, परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले.

या पोस्टवर काही तासांतच 150 हून अधिक कमेंट्स आणि हजारो लाईक्स आले असून, चाहत्यांनी अक्रितीला भावनिक आधार देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

मार्च 2026 मध्ये झाला होता साखरपुडा

अक्रिती अगरवाल आणि पृथ्वी शॉ यांचा साखरपुडा मार्च 2026 मध्ये झाला होता. त्यावेळी पृथ्वीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत नात्याची घोषणा केली होती. लखनौची असलेली अक्रिती नंतर मुंबईत स्थायिक झाली असून, इन्स्टाग्रामवर तिचे 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 'त्रिमुख' या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

जुलैमध्येही उठले होते ब्रेकअपचे तरंग

जुलै 2026 मध्ये अक्रितीने एक गूढ पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यावेळी तिने स्पष्टीकरण देत आपला साखरपुडा मोडला नसल्याचे आणि पृथ्वीसोबतचे नाते कायम असल्याचे सांगितले होते. आपली पोस्ट गैरसमजातून पसरवली गेल्याचेही तिने त्यावेळी नमूद केले होते.

आता मात्र अक्रितीने स्वतःच नाते संपुष्टात आल्याची अधिकृत माहिती दिल्याने, याआधीच्या अफवांना पुष्टी मिळाली आहे. या घडामोडींवर पृथ्वी शॉ याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement