एबी डिव्हिलियर्स याने दक्षिण आफ्रिका टीमचा कर्णधार बनण्याच्या अफवांचे केले खंडन, पाहा काय म्हणाला माजी Proteas फलंदाज
मात्र दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डिव्हिलियर्सने राष्ट्रीय संघाने त्याला संघाच्या नेतृत्वाची ऑफर देण्याबद्दल नकार दिला. डिव्हिलियर्सने ट्विट केले की, "क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने त्याला संघाचे नेतृत्व करण्यास सांगितले होते, जे खरे नाही."
2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या दक्षिण आफ्रिकेचा तुफान फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) याच्या पुनरागमनावर पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याला दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते असेही वृत्त समोर आले आहे. एका टीव्ही चॅनेलनुसार डिव्हिलियर्सला बोर्डाकडून कर्णधार ऑफर देण्यात आली आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डिव्हिलियर्सने राष्ट्रीय संघाने त्याला संघाच्या नेतृत्वाची ऑफर देण्याबद्दल नकार दिला. डिव्हिलियर्सने ट्विट केले की, "क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने त्याला संघाचे नेतृत्व करण्यास सांगितले होते, जे खरे नाही. सध्या कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवावा हे जाणणे कठीण आहे." डिव्हिलियर्स 2018 मध्ये निवृत्त झाला तेव्हा तो संघाचा कर्णधार होता. आताडिविलियर्सने स्टार स्पोर्ट्स शो 'क्रिकेट कनेक्ट' वर बोलताना सध्याच्या अफवांवर स्पष्टीकरण दिले. (Coronavirus: कोरोनाग्रस्तरांच्या मदतीसाठी विराट कोहली याने पुन्हा घेतला पुढाकार, एबी डिव्हिलियर्स याच्या साथीने अशा प्रकारे करणार आर्थिक मदत)
एबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हणाले की, "क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने मला टीमचे नेतृत्व करण्यास सांगितले असल्याचे वृत्त खरे नाही. या दिवसांत कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवावा हे जाणणे कठिण आहे. प्रत्येकजण सुरक्षित रहा." स्टार स्पोर्ट्स शो 'क्रिकेट कनेक्टेड' ने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते की,"त्याला दक्षिण आफ्रिकेने पुन्हा प्रोटियासचे नेतृत्व करण्यास सांगितले आहे." फ्रँचायझी सर्किटवर नियमितपणे काम करत असतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास मी पुरेसा आहे असे वाटत असेल तरच तो पुनरागमन करेल असे एबीने म्हटले.
पाहा एबीचे ट्विट
दुसरीकडे, आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी डिविलियर्सचा राष्ट्रीय संघात विचार केला जाईल असेहीदक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी यापूर्वी सांगितले होते. बाऊचर म्हणाले की, जर तो चांगला फॉर्म दाखवितो आणि स्वत:ला “सर्वोत्कृष्ट” म्हणून सिद्ध करतो तरच त्याला संघात स्थान दिले जाईल. आयसीसी विश्वचषक 2019 पूर्वी कुटुंबासमवेत वेळ घालवल्याचे सांगत डीव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तथापि, क्रिकेट विश्वात विकेटकीपर-फलंदाज अशा प्रकारे निवृत्त झाल्याने त्याच्यावर कडाडून टीका करण्यात आली होती. पण गेल्या बर्याच काळापासून तो संघात परतण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.