खराब फार्ममध्ये असलेल्या Surya kumar Yadav ला AB de Villiers ने दिला लाख मौलाचा सल्ला, म्हणाला...
डीव्हिलियर्सने सांगितले सूर्याने काय करावे? जिओ सिनेमावरील संभाषणादरम्यान, एबी डिव्हिलियर्स म्हणाला...
आयपीएल 2023 मध्ये पहिला सामना गमावलेल्या मुंबई इंडियन्सचा (MI) शनिवारी दुसऱ्या सामन्यात सीएसके विरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी खराब फॉर्मशी झगडत असलेल्या दिग्गज फलंदाज सूर्यकुमार यादवला (Surya Kumar Yadav) आरसीबीचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) मोठा सल्ला दिला आहे. डीव्हिलियर्सने सांगितले सूर्याने काय करावे? जिओ सिनेमावरील संभाषणादरम्यान, एबी डिव्हिलियर्स म्हणाला, “सूर्यकुमार यादव सध्या त्या टप्प्यात आहे जिथे त्याला काहीतरी करण्याची गरज आहे. तथापि, त्यांनी घाबरू नये आणि त्यांच्या गेम प्लॅनमध्ये कोणतेही बदल करू नयेत. एवढी वर्षे तो जसा खेळत होता तसाच खेळायला हवा.
पहिल्याच सामन्यात सूर्या झाला फ्लॉप
आयपीएल 2022 मध्ये सूर्याने मुंबईसाठी अप्रतिम कामगिरी केली. त्याने 8 सामन्यात 303 धावा केल्या. पण सूर्य यावेळी त्या लयीत दिसला नाही. आरसीबीविरुद्धच्या या मोसमातील पहिल्याच सामन्यात सूर्याने 16 चेंडूत 15 धावा केल्या. त्याला केवळ एकच चौकार मारता आला आणि मायकल ब्रेसवेलच्या चेंडूवर शाहबाज अहमदकडे झेलबाद झाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत सूर्या ठरला फ्लॉप
आयपीएलपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सूर्या वाईटरित्या फ्लॉप झाला होता. टी-20 चा नंबर वन बॅट्समन सूर्याची बॅट वनडेत नि:शब्द झाली आहे. शेवटच्या 3 वनडेत त्याला खातेही उघडता आले नाही आणि एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. (हे देखील वाचा: IPL 2023 Orange Cap, Purple Cap List: ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीत बदल! शर्यतीत कोण आहे ते पहा)
सूर्याची तुलना एबी डिव्हिलियर्सशी
सूर्यकुमार यादव मैदानाच्या चारही दिशांनी फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याची तुलना मिस्टर 360 डिग्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हिलियर्सशी केली जाते. नुकतीच या दोन्ही खेळाडूंची भेटही झाली होती. या मोसमात सूर्या चांगली धावा करेल अशी मुंबई इंडियन्सची अपेक्षा आहे, ज्यामुळे संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यास मदत होईल.