IPL Auction 2025 Live

Watch Video: आकाश चोपडा यांची उत्कृष्ठ कलाकारी; बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांचा चित्रपट अग्निपथमधील डायलॉग बोलून प्रेक्षकांचे जिंकले मन

तसेच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया वापर करु लागले आहेत. यातच किक्रेटचा सुरु असताना उत्कृष्ठ कॉमेंट्री करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे आकाश चोपडा (Aakash Chopra) यांच्यात लपलेला अभिनय चाहत्यांसमोर ठेवला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व क्रिकेकर, कॉमेंटेटर आपल्या कुटुंबसमवेत वेळ घालवत आहे. तसेच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया वापर करु लागले आहेत. यातच किक्रेटचा सुरु असताना उत्कृष्ठ कॉमेंट्री करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे आकाश चोपडा (Aakash Chopra) यांच्यात लपलेला अभिनय चाहत्यांसमोर ठेवला आहे. नुकताच आकाश चोपडा यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आकाश चोपडा यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Aamitabh Bachchan) यांच्या अग्निपथ (Agneepath) चित्रपटातील डॉयलॉग बोलले आहे. आकाश चोपडा यांचा फिल्मी अंदाज पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का लागला आहे.

या व्हिडिओत आकाश चोपडा यांनी अभिताभ बच्चन यांच्यासारखाच अभिनय केला आहे. अमिताभ बच्चन यांची 1990 मध्ये आलेला चित्रपट अग्निपथमधील डॉयलॉग बोलले आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन हे अमिताभ बच्चन यांच्यासारखेच एका खुर्चीवर बसले आहेत. त्यानंतर ते डॉयलॉग बोलायला सुरुवात केली आहे. 'पूरा नाम- विजय दीनानाथ चौहान, बाप का नाम- दीनानाथ चौहान, मां का नाम- सुहासिनी चौहान, गांव- मांडवा, उम्र- 36 साल 9 महीना 8 दिन और ये सोलहवां घंटा चालू है।' असे ते म्हणाले आहेत. आकाश चोपडा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. हे देखील वाचा- भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने 2015 नंतर तीन वेळेस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक खुलासा

आकाश चोपडा यांच ट्वीट-

या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात अमिताभ शिवाय मिथुन चक्रवर्ती, डॅनी डेन्झोंगपा, रोहिणी हट्टंगडी, आलोक नाथ, माधवी, नीलम यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. या चित्रपटातील अमिताभच्या अभिनयावर टीका झाली होती तर, मिथुन चक्रवर्ती यांचे कौतुक झाले. मात्र, या दोघांनाही अमिताभ आणि मिथुन दोघांनाही अभिनयासाठी पुरस्कार मिळाला होता.