RR vs GT, IPL 2023 Match 48: गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज चुरशीची लढत, सर्वांच्या नजरा या दिग्गज खेळाडूंवर

या हंगामात आतापर्यंत झालेल्या नऊ सामन्यांपैकी गुजरात टायटन्सने सहा आणि राजस्थान रॉयल्सने (GT vs RR) पाच जिंकले आहेत. राजस्थान आणि गुजरात या दोन्ही संघांनी यापूर्वीचे सामने गमावले आहेत, अशा परिस्थितीत दोघेही विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील.

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या (IPL 2023) रिंगणात संजू सॅमसन (Sanju Samson) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुसऱ्यांदा भिडणार आहेत. आयपीएलच्या या दोन कर्णधारांच्या संघात खूप ताकद आहे. या हंगामात आतापर्यंत झालेल्या नऊ सामन्यांपैकी गुजरात टायटन्सने सहा आणि राजस्थान रॉयल्सने (GT vs RR) पाच जिंकले आहेत. राजस्थान आणि गुजरात या दोन्ही संघांनी यापूर्वीचे सामने गमावले आहेत, अशा परिस्थितीत दोघेही विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील. या दोघांमधील हा सामना राजस्थान रॉयल्सचे होम ग्राऊंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. (हे देखील वाचा: RR vs GT Free Live Streaming Online: गुजरातचे 'टायटन्स' भिडणार राजस्थानच्या 'राजवाड्स'शी, जाणून घ्या घरबसल्या कुठे पाहणार लाइव्ह सामना)

सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर असतील

यशस्वी जैस्वाल

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आयपीएलच्या 16 व्या हंगामात आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 9 सामन्यांमध्ये यशस्वी जैस्वालने 47.56 च्या सरासरीने आणि 159.70 च्या स्ट्राईक रेटने 428 धावा केल्या आहेत. यादरम्यान यशस्वी जैस्वालने 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत.

विजय शंकर

गुजरात टायटन्सकडून खेळणारा मधल्या फळीतील फलंदाज विजय शंकर या स्पर्धेत अनेकदा प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळताना दिसला आहे आणि अनेक डावांमध्ये विजय शंकरने आपला प्रभाव टाकून संघाला विजय मिळवून दिला आहे. आता खेळलेल्या 7 डावांमध्ये शंकरने 41 च्या सरासरीने आणि 158.91 च्या स्ट्राईक रेटने 205 धावा केल्या आहेत. यादरम्यान विजय शंकरच्या बॅटमधून 2 अर्धशतके झाली आहेत.

जॉस बटलर

राजस्थान रॉयल्सचा दुसरा सलामीवीर जोस बटलरही या स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 9 डावांमध्ये जोस बटलरने 32.11 च्या सरासरीने आणि 138.94 च्या स्ट्राईक रेटने 289 धावा केल्या आहेत. यादरम्यान जोस बटलरने आतापर्यंत 3 अर्धशतक ठोकले आहेत.

शुभमन गिल

गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये 9 डाव खेळले आहेत, ज्यात शुभमन गिलने 37.67 च्या सरासरीने आणि 140.66 च्या स्ट्राइक रेटने 339 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने या मोसमात आतापर्यंत 3 अर्धशतके झळकावली आहेत.

मोहम्मद शमी

गुजरात टायटन्सचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. मोहम्मद शमी या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 17 बळी घेणारा गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमी आपल्या गोलंदाजीने चमत्कार घडवू शकतो.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल.

गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव.