Asia Cup 2023 Opening Ceremony Live Streaming: A.R. Rahman आणि Atif Aslam आशिया चषकाच्या उद्घाटन सोहळ्याची करणार सुरुवात, भारतात येथे पहा लाइव्ह

आशिया चषक 2023 चा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ (PAK vs NEP) यांच्यात मुलतानच्या मैदानावर होणार आहे. याआधी भव्य उद्घाटन सोहळाही आयोजित केला जाणार आहे.

Asia Cup 2023 (Photo Credit - Twitter)

तमाम क्रिकेटप्रेमी आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) ची आतुरतेने वाट पाहत आहेत. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच, हायब्रीड मॉडेलचा अवलंब करण्यात आला आहे, ज्यामध्ये पाकिस्तान (Pakistan) यजमान असूनही तेथे केवळ 4 सामने आयोजित केले जातील. तर फायनलसह 9 सामने श्रीलंकेत (Sri Lanka) खेळवले जाणार आहेत. 2018 सालानंतर आशिया चषकाचे सर्व सामने एकदिवसीय स्वरूपात खेळवले जातील. आशिया चषक 2023 चा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ (PAK vs NEP) यांच्यात मुलतानच्या मैदानावर होणार आहे. याआधी भव्य उद्घाटन सोहळाही आयोजित केला जाणार आहे. यामध्ये प्रसिद्ध गायक ए आर रहमान (A.R. Rahman) आणि आतिफ अस्लम (Atif Aslam) यांच्या आवाजाची जादू पाहायला मिळणार आहे.

भारतात कुठे पाहणार लाइव्ह

आशिया चषक 2023 चा उद्घाटन सोहळा पाकिस्तानातील मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा सुरू होईल, जो दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. आशिया कप 2023 च्या उद्घाटन सोहळ्याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. तसेच चाहते त्यांच्या मोबाईलवर डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर उद्घाटन समारंभाचे विनामूल्य थेट प्रवाह पाहू शकतात. (हे देखील वाचा: Asia Cup 2023: आजपासून आशिया चषक स्पर्धेला होणार सुरुवात, नेपाळ भिडणार पाकिस्तानसोबत; वाचा पहिल्या सामन्याशी संबंधित खास गोष्टी)

पाकिस्तान प्लेइंग 11

बाबर आझम (कर्णधार), इमाम-उल-हक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ.

नेपाळ संघ

रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुरटेल, आसिफ शेख, भीम शार्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्रसिंग आयरे, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, अपेक्षा जीसी, मौसम ढकल, संदीप जोरा, किशोर. महतो, अर्जुन सौद.