WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांवर एक नजर, मनोरंजक आकडेवारी आणि महत्वाची माहिती येथे घ्या जाणून
11 जूनपासून सुरु होणाऱ्या या कसोटी सामन्यात कोण बाजी मारेल याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ही लढत एक ऐतिहासिक अध्याय ठरू शकते.
South Africa National Cricket Team vs Australia National Cricket Team, WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 (World Test Championship 2025) चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) या दोन बलाढ्य संघांमध्ये 11 ते 15 जूनदरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर पार पडणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरु होईल. टॉस सामना सुरु होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 3 वाजता होईल. ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या हाती देण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेची कमान अनुभवी टेंबा बावुमा सांभाळणार आहेत. दोघेही कर्णधार कसोटी क्रिकेटमध्ये आपापल्या संघांचे आधारस्तंभ ठरले आहेत.
दोन्ही संघांमध्ये धमाकेदार खेळाडूंचा समावेश
ऑस्ट्रेलियासाठी फिट झालेला ऑलराउंडर कॅमेरून ग्रीन संघात परतला आहे. तर, जोश हेजलवूडलाही अंतिम सामन्यात खेळण्यास मान्यता मिळाली आहे.दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी संघात पुनरागमन करत असून रबाडा, मार्को जानसन, डेन पैटर्सन, कॉर्बिन बॉशसह वेगवान माऱ्याचा ताफा सज्ज आहे. केशव महाराज आणि सेनुरान मुथुसामी फिरकीचा भार सांभाळतील. (हे देखील वाचा: AUS vs SA, WTC Final Live Streaming In India: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेतेपदाची लढाईत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने, भारतात कुठे पाहणार लाईव्ह स्ट्रीमिंग?)
तिसऱ्या डब्ल्यूटीसी हंगामातील दोन्ही संघांची कामगिरी
डब्ल्यूटीसीच्या तिसऱ्या सीझनमध्ये दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी करत 12 पैकी 8 सामने जिंकले आणि केवळ 3 गमावले. यामुळे त्यांचा गुणांचा टक्का 69.44% इतका झाला आणि त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने 17 सामन्यांपैकी 11 विजय मिळवत आणि 4 सामने गमावत 63.73% गुण मिळवले. त्यांनी टीम इंडियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 3-1 ने जिंकत फायनलमध्ये स्थान निश्चित केले.
हेड टू हेड रेकॉर्ड (SA vs AUS Head to Head)
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 1902 मध्ये खेळला गेला होता. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 101 सामने खेळले गेले आहेत. या काळात ऑस्ट्रेलियाने वरचढ कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने 54 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने फक्त 26 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील 21 सामने अनिर्णित राहिले आहेत. आतापर्यंत इंग्लंडच्या भूमीवर दोघांमध्ये एकूण तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत. या काळात ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.
दोन्ही संघांचा अंतिम संघ
दक्षिण आफ्रिका: बावुमा (कर्णधार), डी ज़ोरज़ी, मार्कराम, मुल्डर, जानसन, रबाडा, महाराज, एनगिडी, बॉश, वेरिन्ने, बेडिंगहैम, स्टब्स, रिकेलटन, मुथुसामी, पैटर्सन.
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोनस्टास, मॅट कुह्नमॅन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.
(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2025 06:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

