SA vs AUS (Photo Credit -X)

South Africa National Cricket Team vs Australia National Cricket Team, WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 (World Test Championship 2025) चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) या दोन बलाढ्य संघांमध्ये 11 ते 15 जूनदरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर पार पडणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरु होईल. टॉस सामना सुरु होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 3 वाजता होईल. ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या हाती देण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेची कमान अनुभवी टेंबा बावुमा सांभाळणार आहेत. दोघेही कर्णधार कसोटी क्रिकेटमध्ये आपापल्या संघांचे आधारस्तंभ ठरले आहेत.

दोन्ही संघांमध्ये धमाकेदार खेळाडूंचा समावेश

ऑस्ट्रेलियासाठी फिट झालेला ऑलराउंडर कॅमेरून ग्रीन संघात परतला आहे. तर, जोश हेजलवूडलाही अंतिम सामन्यात खेळण्यास मान्यता मिळाली आहे.दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी संघात पुनरागमन करत असून रबाडा, मार्को जानसन, डेन पैटर्सन, कॉर्बिन बॉशसह वेगवान माऱ्याचा ताफा सज्ज आहे. केशव महाराज आणि सेनुरान मुथुसामी फिरकीचा भार सांभाळतील.

डब्ल्यूटीसीमध्ये दोन्ही संघांची कामगिरी

दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध विजय मिळवून फाइनलमध्ये प्रवेश केला होता. भारतासोबत त्यांची मालिका बरोबरीत सुटली होती. ऑस्ट्रेलियाने नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताला 3-1 ने पराभूत करून फायनलमध्ये आपली जागा पक्की केली.

थेट प्रसारण कुठे पाहाल?

भारतामध्ये या थरारक अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण Star Sports Network वर करण्यात येणार आहे. तर JioCinema आणि Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

दोन्ही संघांचा अंतिम संघ 

दक्षिण आफ्रिका: बावुमा (कर्णधार), डी ज़ोरज़ी, मार्कराम, मुल्डर, जानसन, रबाडा, महाराज, एनगिडी, बॉश, वेरिन्ने, बेडिंगहैम, स्टब्स, रिकेलटन, मुथुसामी, पैटर्सन.

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, अ‍ॅलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोनस्टास, मॅट कुह्नमॅन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.