LSG vs CSK, IPL 2024 34th Match: लखनौ आणि चेन्नई यांच्यात होणार आज हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत 5 व्या स्थानावर आहे.

LSG vs CSK (Photo Credit - X)

LSG vs CSK, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 34 वा (IPL 2024) सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs LSG) यांच्यात होणार आहे. लखनौच्या घरच्या मैदानावरील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत 5 व्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा शेवटचा सामना गमावला आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज संघ मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून मैदानात उतरत आहे. लखनौ सुपर किंग्जचा सामना आज त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स सध्या 6 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. लखनौ संघासाठी निकोलस पुरन चांगलाच फॉर्मात आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जकडून शिवम दुबेचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव करत स्पर्धेतील चौथा विजय नोंदवला. चेन्नई सुपर किंग्ज पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात रुतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि मथिशा पाथिराना यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यासोबतच एमएस धोनीने 4 चेंडूत 20 धावांची खेळीही खेळली आहे. चेन्नई सुपर किंग्जला सामना जिंकण्याची अधिक संधी आहे. (हे देखील वाचा: LSG vs CSK, IPL 2024 34th Match: एकना स्टेडियमवर कोणाला मिळणार मदत, गोलंदाज की फलंदाज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)

सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर 

रवी बिश्नोई: लखनऊ सुपर जायंट्सचा स्टार गोलंदाज रवी बिश्नोईने या मैदानावर आतापर्यंत 12 विकेट घेतल्या आहेत. आजच्या सामन्यातही रवी बिश्नोई चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विकेट घेऊ शकतो.

ऋतुराज गायकवाड: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडने गेल्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले आहे. रुतुराज गायकवाडनेही लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या तीन सामन्यात 158 धावा केल्या आहेत.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्ज : रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथिराना.

लखनौ सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक, केएल राहुल ( विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, मयंक यादव.